Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी

शाकाहारी खाद्यप्रेमींसाठी सोयाबीन म्हणजे त्यांचे चिकनच! अशात आज आम्ही तुमच्यासाठी सोयाबीनची एक चविष्ट आणि सर्वांच्या आवडीची अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. घरीच हॉटेल स्टाईल सोया चिली कशी तयार करायची ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 15, 2025 | 09:55 AM
शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

देशात चायनीज लव्हर्सची काही कमी नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच इंडो-चायनीज फूड खायला फार आवडतं. चायनीजमध्ये चिलीचा प्रकार फार फेमस चिकन चिली, पनीर चिली आणि यातीलच एक म्हणजे सोया चिली. सोयाबिन अनेकांना खायला आवडत नाही मात्र यात भरपूर पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात अशात तुम्ही यापासून चविष्ट अशी सोयाबीन चिली तयार करू शकता. अनेक हॉटेल्स अथवा ढाब्यांमध्ये हा पदार्थ फार लोकप्रिय आहे मात्र आज आम्ही तुम्हाला याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.

उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी

सोया चंक्स हे प्रोटिनने भरलेले आणि चविष्ट पर्याय आहे, जे शाकाहारी लोकांसाठी मटण किंवा चिकनला उत्तम पर्याय ठरते. “सोया चिली” ही इंडो-चायनीज डिश आहे, जी थोडी झणझणीत, गोडसर आणि खमंग लागते. सोया चंक्सना मसाल्यात मॅरिनेट करून, कुरकुरीत फ्राय करून, चायनीज सॉससह परतवले जाते. ही रेसिपी पार्टी स्नॅक्स, स्टार्टर किंवा संध्याकाळच्या खाऊसाठी खूपच छान पर्याय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • सोया चंक्स – 1 कप
  • आलं-लसूण पेस्ट – 2 चमचा
  • तिखट – 1/2 चमचा
  • हळद – 1/4 चमचा
  • कॉर्नफ्लोअर – 2 चमचे
  • मैदा – 1 चमचा
  • पाणी – गरजेप्रमाणे
  • तेल – तळण्यासाठी
  • कांदा (चिरलेला) – 1 मध्यम
  • सिमला मिरची (चिरलेली) – 1 मध्यम
  • हिरव्या मिरच्या – 2 (लांब चिरून)
  • सोया सॉस – 1 चमचा
  • चिली सॉस – 1 चमचा
  • टोमॅटो सॉस – 2 चमचे
  • व्हिनेगर – 1 टीस्पून
  • काळी मिरी पावडर – 1/4 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • कांद्याची पात – सजावटीसाठी
  • तेल – 1-2 चमचे
पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice

कृती

  • सोया चिली तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळा, त्यात सोया चंक्स टाका आणि 7-8 मिनिटं शिजवून घ्या. नंतर पाणी गाळा आणि चंक्स थोडे दाबून कोरडे करा.
  • शिजवलेले सोया चंक्स वरील मॅरिनेशनच्या साहित्यात मिसळा. चांगलं मिक्स करून 15-20 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवा.
  • गरम तेलात मॅरिनेट केलेले चंक्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. किचन टिशूवर काढा.
  • कढईत थोडं तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कांदा व सिमला मिरची घालून थोडंसं परतवून घ्या.
  • त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळी मिरी टाकून चांगलं मिक्स करा.
  • तळलेले सोया चंक्स या मिश्रणात घालून 2-3 मिनिटं मिक्स करा, जेणेकरून चंक्सवर सॉस चांगले माखतील.
  • वरून कांदापात टाकून यांना गरमागरम सर्व्ह करा.
  • हवे असल्यास तुम्ही थोडी कॉर्नफ्लोअर-पाण्याचाची स्लरी घालून ग्रेवी जाडसर करू शकता.
  • अधिक झणझणीत हवं असल्यास लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स वापरा
  • तुम्ही नूडल्ससह यांना खाण्यासाठी सर्व्ह करू शकता
  • आम्ही तुम्हाला सांगतो की, हे चपातीसोबत देखील चवीला छान लागतात

Web Title: Know how to make restaurant style soya chili at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • soyabin

संबंधित बातम्या

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
1

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.