रडल्यामुळे शरीराला होणारे फायदे
रडणे ही एक सामान्य भावना आहे. काहींना छोट्या छोट्या गोष्टींवरून रडण्याची सवय असते. कोणत्याही गोष्टीचे दुःख झाल्यानंतर किंवा आनंद झाल्यानंतर डोळ्यांतून अश्रूं येऊ लागतात. पण मनुष्य का रडतात? डोळ्यांमधून पाणी का येतं? रडल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? आमच्या प्रमाणे असे अनेक प्रश्न तुम्हालासुद्धा पडले असतील ना. याशिवाय बाळाचा जन्म झाल्यानंतर सगळ्यात आधी बाळ मोठ्याने रडते. बाळ जन्म आल्यानंतर रडले तर त्याचे आरोग्य निरोगी राहते. चला तर जाणून घेऊया रडल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
डोळ्यांमध्ये साचून राहिलेली घाण, धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी येणारे अश्रू म्हणजे रिफ्लेक्स अश्रू होय. तसेच डोळ्यांमधून सतत वाहणारे अश्रू डोळे कायम ओलेच ठेवतात. यामुळे डोळ्यांच्या संसर्गापासून बचाव होतो. डोळ्यांमधून सतत येणारे भावनिक अश्रू आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. सतत येणाऱ्या अश्रूंमधून 98 टक्के पाणी डोळ्यांमधून येते. भावनिक अश्रूंमध्ये मानसिक तणाव आणि शरीरातील इतर विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. त्यामुळे भावनिक अश्रुंचे शरीराला अनेक फायदे आहेत.
डोळ्यांमधून येणारे भावनिक अश्रू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या अश्रूंमुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो. याशिवाय रडल्यामुळे पॅरा-सिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होण्यास मदत होते. शरीराला आराम देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी भावनिक अश्रू अतिशय महत्वाचे आहेत. रडल्यानंतर काहीवेळ तुम्हाला खूप शांतबी वाटते.
रडल्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. यामुळे मन सुद्धा निरोगी राहते. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी रडणे आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही रडता तेव्हा तुम्ही तोंडाने हवा घेता, ज्यामुळे मेंदूचे तापमान कमी होऊन जाते. या स्थितीमध्ये मेंदूचे तापमान थंड असते, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
काहीवेळा तुम्ही जास्त घाबरलेले असता किंवा आनंदी, तणावग्रस्त असता तेव्हा अचानक काहींना रडायला येत. मात्र यामुळे तुमच्या भावना संतुलित होतात आणि मनाला चांगले वाटते. याशिवाय दीर्घकाळ रडल्यामुळे ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन बाहेर पडून जातात. ही रसायने भावनिक आणि शारीरिक वेदना कमी करून आनंद निर्माण करतात.