फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे त्वचेमध्ये दिसून येणारी लक्षणे
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. त्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे यकृत. यकृताचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक तणाव, जंक फूडचे सेवन, मद्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम यकृताच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. यकृतामध्ये अनावश्यक चरबी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. फॅटी लिव्हरची समस्या प्रामुख्याने मधुमहे आणि वाढलेल्या वजनाने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. तसेच शरीरामध्ये फॅटी लिव्हरची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचणार नाही. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात सगळ्यात आधी थकवा जाणवू लागतो. थोडस काम केल्यानंतर किंवा चालून आल्यानंतर लगेच शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. यकृतावर अतिरिक्त चरबीब जमा झाल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
यकृतावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे डोळे पिवळे पडणे, डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसू लागतो इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे त्वचा सुद्धा पिवळी पडून जाते. त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे पोटात पाणी होणे, पोटामध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. पोटात पाणी जमा झाल्यानंतर मळमळ होणे, उलटी सारखं वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटात पाणी जमा झाल्यानंतर पोटात अनेक वेदना होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. अन्यथा आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. लिव्हरमध्ये जळजळ होणे, वेदना होणे, मळमळ उलटी होणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यास वेळीच औषध उपचार करावे. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सकाळीं उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे.