Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

Foods To In Low Blood Pressure: लो ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास सतत थकवा जाणवतो किंवा चक्कर देखील येते. म्हणून काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आराम मिळू शकतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 08:50 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • लो बीपीमुळे त्रस्त आहात?
  • आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ
  • कोणते पदार्थ टाळावेत?
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लो ब्लड प्रेशर म्हणजेच कमी रक्तदाबाची समस्या अनेकांमध्ये वाढताना दिसत आहे. सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा अशक्तपणा जाणवणे ही लो बीपीची सामान्य लक्षणे मानली जातात. तज्ज्ञांच्या मते, फक्त औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली स्वीकारल्यास लो बीपी नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे होऊ शकते. विशेषतः शरीरात पाण्याची कमतरता आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो.

Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत

लो ब्लड प्रेशरमध्ये काय खावे?

लो बीपीच्या रुग्णांनी शरीराला ऊर्जा देणारे आणि रक्तनिर्मितीस मदत करणारे पदार्थ खाणे आवश्यक मानले जाते. अंडी, दूध, दही, बदाम, केळी, डाळिंब, बीट, हिरव्या पालेभाज्या आणि अंकुरित धान्य यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो. या पदार्थांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असते. दिवसातून तीन मोठ्या जेवणांऐवजी ४ ते ५ वेळा थोडे-थोडे खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते.

मीठ आणि पाण्याचे संतुलन महत्त्वाचे

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मीठाचे किंवा सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. सोडियम रक्तदाब वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर नारळपाणी, ताक, लिंबूपाणी आणि ORS सारखे पेय शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. तसेच, दिवसाला शरीराला आवश्यक पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.

हळूहळू हालचाल करा

लो ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी झोपेतून किंवा खुर्चीतून अचानक उठणे टाळावे. अचानक हालचाल केल्यास चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आधी काही सेकंद बसून मग हळूहळू उभे राहणे अधिक सुरक्षित मानले जाते. नियमित हलका व्यायामही रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो.

कोणते पदार्थ टाळावेत?

लो ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी जास्त तेलकट, तळलेले आणि अतिगोड पदार्थ टाळणे आवश्यक आहे. मद्यपान आणि सतत उपाशी राहणेही धोकादायक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये जास्त कॅफीनयुक्त पेय किंवा अनियमित आहारामुळेही रक्तदाब अस्थिर होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यावर भर देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे

Web Title: Low blood pressure diet tips foods to eat hypotension symptoms and prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
1

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
2

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
3

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
4

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.