Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metabolic Health: तरुणांमध्ये Protein खाण्याचा वाढता ट्रेंड! अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास किडनीवर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

Metabolic Health: अतिप्रमाणात प्रोटीन असलेल्या पदार्थांचे किंवा सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गरजेपुरतेच प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2026 | 08:01 AM
तरुणांमध्ये Protein खाण्याचा वाढत ट्रेंड! अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

तरुणांमध्ये Protein खाण्याचा वाढत ट्रेंड! अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Follow Us
Follow Us:

Metabolic Health: निरोगी जीवनशैली आणि फिटनेस फॉलो करण्यासाठी मुलांसह मुली देखील जिममध्ये जातात. जिममध्ये व्यायाम, शारीरिक हालचालींसोबतच आहारात प्रोटीन पावडरचा सुद्धा समावेश केला जातो. बॉडीबिल्डिंग करणे, स्नायूंची ताकद वाढवणे, व्यायामानंतर होणारी स्नायूंची झीज भरून काढणे आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रोटीन घेतले जातात. प्रोटीन पावडर दुधातून किंवा पाण्यात मिक्स करून प्यायली जाते. धावपळीची जीवनशैली आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे आहारात न मिळणारे प्रोटीन भरून काढण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – istock)

Cortisol Hormone: सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने प्रोटीन पावडरचे सेवन केल्यास स्नायूंची झीज भरून निघण्यास मदत होते. पण फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर प्रोटीनचे सेवन केले जाते. आहारात अतिप्रमाणात प्रथिनांचा समावेश केल्यास शरीरातील अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते. प्रोटीनचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. पौष्टिक घटकांचे आवश्यक प्रमाणात सेवन न केल्यास शरीरातील अवयवांना गंभीर इजा होऊ शकते. चला तर जाणून घेऊया अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.

प्रथिनांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास उद्भवणाऱ्या समस्या:

प्रोटीन सप्लीमेंट्सचे सेवन केल्यामुळे स्नायू मजबूत होतात. पण चुकीच्या पद्धतीने प्रोटीनचे सेवन केल्यामुळे लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्रोटीन पावडरचे मोठे डोस घेण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक वेगवेगळे बदल दिसून येतात. त्यामुळे योग्य माहिती न घेता कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करू नये. बाजारात मिळणारी काही सप्लिमेंट्स सुरक्षित असतात. पण चुकीच्या पद्धतीने आणि अतिप्रमाणात सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

किडनी निकामी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • डोळ्यांभोवती, पायांच्या टाचांवर सूज येणे.
  • रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला होणे.
  • लघवीमध्ये फेस येणे.
  • ओटीपोटात वेदना होणे.
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

प्रोटीन पावडरला संपूर्ण आहाराचा पर्याय न बनवता, रोजच्या आहारात शरीराला प्रोटीन देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास किडनीच्या किंवा शरीरातील इतर कोणत्याही अवयवांना इजा पोहचणार नाही. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर तयार होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किडनीला दिवसभर भरपूर पाणी प्यावे लागते. सामान्य जीवनशैली असलेल्या निरोगी व्यक्तींना आहारात ०.८ ग्रॅम ते १ ग्रॅम प्रथिनांची गरज असते. नियमित वजन उचलणे किंवा जास्त व्यायाम करत असलेल्या व्यक्तींना १.२ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणांमध्ये प्रोटीन सेवनाचा ट्रेंड का वाढत आहे?

    Ans: जिममध्ये व्यायाम करणे, स्नायूंची वाढ करणे, बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसकडे वाढलेला कल यामुळे तरुणांमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ आणि प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर वाढत आहे.

  • Que: प्रोटीन जास्त घेतल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: काही व्यक्तींना पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता किंवा जुलाब यांसारखे पचनाचे त्रास होऊ शकतात. मात्र, ही लक्षणे केवळ प्रोटीनच्या अतिसेवनामुळेच होतात असे नाही.

  • Que: प्रोटीन पावडरचे सेवन रोज करणे सुरक्षित आहे का?

    Ans: प्रोटीन पावडर प्रत्येकासाठी आवश्यक नसते. आहारातून पुरेसे प्रोटीन मिळत नसल्यास किंवा व्यायामाच्या गरजेनुसार त्याचा उपयोग होऊ शकतो.

Web Title: Metabolic health can excessive protein intake harm your kidneys risks every young adult should know sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • protin

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.