उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात अनेक जण दिवसातून अनेक वेळा फेसवॉश करतात. पण त्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते. त्वचा कोरडी झाल्यानंतर शरीर अधिक तेल तयार करते आणि त्यातून एक्ने वाढू शकतात. तज्ज्ञ दिवसातून फक्त दोन वेळा सौम्य फेसवॉश वापरण्याचा सल्ला देतात.
अनेक फेसवॉश किंवा साबण त्वचेच्या नैसर्गिक pH स्तराशी जुळत नाहीत. त्वचेचा pH साधारण ५.५ असतो. तर काही क्लिन्झरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्वचेचा बॅरिअर कमकुवत होतो आणि पिंपल्स, लालसरपणा व जळजळ वाढू शकते.
चेहरा घासून स्वच्छ करण्याची सवय अनेकांना असते. मात्र हार्श स्क्रबिंगमुळे त्वचेवर सूज येऊ शकते आणि बॅक्टेरिया संपूर्ण चेहऱ्यावर पसरू शकतात. त्यामुळे नवीन पिंपल्स येण्याचा धोका वाढतो. सौम्य एक्सफोलिएशनच हेल्दी त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते.
गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा अधिक ड्राय होते. म्हणून सतत गरम पाण्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात मॉइश्चरायझरची गरज नसते हा समज चुकीचा आहे. योग्य मॉइश्चरायझर त्वचेचे संरक्षण करत स्किन बॅरिअर मजबूत ठेवण्यास मदत करते.
त्वचेवर सतत पिंपल्स येत असल्यास केवळ प्रॉडक्ट बदलणे पुरेसे नसते. योग्य आहार, पुरेशी झोप, कमी ताण आणि सौम्य स्किनकेअर रूटीन ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच, स्कीन टाइप ओळखूनच उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: सावधान! सतत घाम येतोय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचा असू शकतो धोका






