
१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यदायी ब्रोकोली सूप
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. नाश्त्यात चविष्ट आणि पोट भरेल असे पदार्थ खावेत. पण सतत तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. थंडीच्या दिवसांमध्ये सूप आवडीने प्यायले जाते. सूप प्यायल्याशिवाय हिवाळा ऋतू चालू झाल्यासारखे वाटत नाही. कायमच हॉटेलमधील विकतचे सूप आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेल्या सूपचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्रोकोली सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांसह मोठेसुद्धा शिजवलेला किंवा फ्राय केलेला ब्रोकोली खाण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे तुम्ही मुलांना या पद्धतीने ब्रोकोली सूप बनवून पिण्यास देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यात खाल्ले पौष्टिक पदार्थ शरीरासाठी फायदेशीर असतात. ब्रोकोलीमध्ये लोह, प्रथिने आणि विटामिन सी इत्यादी घटक आढळून येतात. लहान मुलांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मुलांना ब्रोकोली सूप पिण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)