उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा अक्रोड खजूर शेक
श्रावण महिन्याला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी किंवा शनिवारी उपवास केला जातो. तसेच भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी काही महिला निर्जळी उपवास करतात. मात्र या उपवासामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी काहींना काही खावे. उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. साबुदाण्यांपासून खिचडी किंवा खीर बनवली जाते.मात्र नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही काहींना काही नवीन पदार्थ बनवून शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अक्रोड खजूर शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा शेक प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – pintrest)
नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी
मक्याच्या दाण्यांचा वापर करून नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘कॉर्न-रवा बॉल्स’, नोट करून घ्या रेसिपी