झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ
हल्ली प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक वेळी जंक फूड किंवा हॉटेलमधील पदार्थ खाल्ले जातात. पण सतत फास्टफूड, जंक फूड, पॅकेट फूड, फॅन्सी फूड खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. सतत तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात बाहेरील पदार्थांचे सेवन न करता घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. श्रावण महिन्यात सतत शाहाकारी पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नेहमीच जेवणात भाजी काय बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये डाळिंब्यांची उसळ बनवू शकता. डाळिंब्याची उसळ किंवा वालाची भाजी असे सुद्धा म्हंटले जाते. कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण इत्यादी पदार्थांचे चमचमीत वाटण तयार करून भाजी बनवली जाते. चला तर जाणून घ्या डाळिंब्याची उसळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ
१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज,चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी