सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा अननस पुदिन्याची स्मूदी
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. नाश्त्यात कांदापोहे किंवा उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही अननस पुदिन्याची स्मूदी बनवी शकता. स्मूदीचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय यामध्ये असलेले पदार्थांमुळे त्वचेवर चमक वाढते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचा अतिशय काळवंडून जाते. काळी आणि निस्तेज झालेली त्वचा सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. घरातील पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय अननसमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे त्वचा अतिशय सुंदर होते. चला तर जाणून घेऊया अननस पुदिना स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड, नोट करून घ्या रेसिपी
रविवार होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा वेट लॉस ब्रेड पिझ्झा, वाढणार नाही अतिरिक्त वजन