वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड
वजन वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. या चरबीमुळे मधुमेह,. कोलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता वाढलेले वजन कमी करण्यावर भर द्यावा. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक महिला प्रोटीनशेक, बाजारात उपलब्ध असलेले महागडे डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. तर काही लोक सकाळचा आणि संध्याकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता नाश्ता करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)