
१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
दक्षिण भारतीय पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहेत. इडली, डोसा, नीर डोसा इत्यादी पारंपरिक चवीचे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. इडली किंवा डोसा बनवल्यानंतर त्यासोबत पांढऱ्या रंगाची खोबऱ्याची चटणी बनवली जाते. ही चटणी तामिळनाडूमध्ये इडली, डोसा, उत्तप्पा आणि वड्यासोबत आवर्जून खातात. पण नेहमीच खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तामिळ पद्धतीने चटकदार कांद्याची चटणी बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच अतिशय आवडीने खातील. कांद्याची चटणी केवळ इडली, डोसासोबतच नाहीतर इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता. अनेकदा भाजी काय बनवावी सुचत नाही, अशावेळी खोबऱ्याची चटणी बनवली जाते. पण खोबऱ्याची चटणी खाल्ल्यामुळे काहीवेळा ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी खोबऱ्याचा वापर न करता कांद्याची चटणी तुम्ही बनवू शकता. हॉटेलसारखी चमचमीत चटणी खाल्ल्यास जिभेवर कायमच चव रेंगाळत राहील. चला तर जाणून घेऊया कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)