नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. तर अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करत नाहीत. पण असे न करता नेहमीच सकाळचा पौष्टिक आणि पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरिराला खूप फायदे होतात. अनेकांना सकाळच्या नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्याची सवय असते. कायमच तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे कायमच चविष्ट पदार्थांचे पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिकबीटरूट ज्वारी थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना बीटपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’






