सर्वप्रथम बाजरी स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे काढून 15 मिनिटं निथळत ठेवावी. 15 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बाजरी जाडसर वाटून घ्या.
बरेच लोक बाजरीचा कोंडा काढून टाकतात पण तसं करू नका. कारण हा कोंडाही पौष्टिक असतो.
मूगडाळ-तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. आता बाजरीची जाडसर भरड, मूगडाळ, तांदूळ एका स्टीलच्या पातेल्यात घाला. त्यात अंदाजे चार ते पाच वाट्या पाणी घालावे.
नंतर खोबरं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून एकत्र वाटून घ्यावे. आणि हे वाटण त्यात घालावे. नंतर मग शेंगदाणे, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे.
मोठ्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवून कुकरच्या दोन शिट्या करून 8 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवावे. प्रत्येक कुकरचा अंदाज वेगळा असतो. तेव्हा आपल्या अंदाजानुसार ठेवा.
साध्या खिचडीपेक्षा 5 ते 6 मिनिटं जास्त लागतील.खिचडा शिजल्यानंतर चमच्यानं नीट हलवून एकत्र करावा. कारण बाजरीचा लगदा भांड्याच्या तळाशी बसतो.
नंतर एका छोट्या कढलीत तेल तापवा. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरं घालावे.ते तडतडलं की त्यात लसूण घालून चांगला लाल होऊ द्यावा.
आता त्यात कढीपत्ता घाला. कढीपत्ता तळला गेला की त्यात सुक्या लाल मिरच्या घाला.
नंतर हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच गॅस बंद करावा. अशा प्रकारे बाजरीचा पौष्टिक खिचडा तयार आहे.
Web Title: Make bajri khichda in gavran style learn the recipe nrrd