सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा बीट ओट्स थालीपीठ
संध्याकाळच्या वेळी प्रत्येकालाच भूक लागते. नाश्त्यात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव किंवा इतर तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. पण सतत तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. कारण तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात कमीत कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बीट ओट्स थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. याशिवाय अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात ओट्स खातात. ओट्स खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही थालीपीठ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बीट ओट्स थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स,नोट करा रेसिपी
कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी