
रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे
Beetrrot Oats Appe: सर्वच लहान मुलं बीट आणि भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. भाज्या पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण भाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केल्यास आरोग्य निरोगी राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीट ओट्स आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले बीट आप्पे सर्वच लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा बीट खाल्ल्यास रक्ताची कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पोषक घटकांनी समृद्ध असलेले बीट ओट्स आप्पे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)