संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
Food Recipe: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप जास्त आवडते. हा पदार्थ ५ ते १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. बऱ्याचदा काहींना काही टेस्टी खाण्याची इच्छा झाल्यानंतर मॅगीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच साधी मॅगी खाण्याऐवजी वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेली मसाला मॅगी नक्कीच बनवून पहा. लहान मुलं भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. त्यामुळे मुलांना या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भाज्या मिक्स करून खाण्यास द्याव्यात. ज्यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. भूक लागल्यानंतर नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ आणून खाण्याऐवजी झटपट तयार होणारी मॅगी बनवून खावी. यामुळे पोटसुद्धा भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया मसाला मॅगी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






