Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Cold Sandwich Recipe : चिकनमध्ये प्रोटीनचा चांगला साठा आढळतो ज्यामुळे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चिकन कोल्ड सँडविच चांगला पर्याय ठरतो. तुम्ही फार कमी वेळात ही रेसिपी घरी बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 09:40 AM
Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • स्नॅक्ससाठी चिकन कोल्ड सँडविच चांगला पर्याय ठरतो.
  • हा सँडविच चवीचा फार छान लागतो.
  • घरीच कॅफे स्टाईल सँडविच बनवता येतो.
हलके, पौष्टिक आणि चवदार असे काही खायचे असेल तर कॅफे स्टाईल कोल्ड चिकन सँडविच हा उत्तम पर्याय ठरतो. शहरातील कॅफेमध्ये मिळणाऱ्या या सँडविचची खासियत म्हणजे त्याचा क्रीमी टेक्स्चर, ताज्या भाज्यांचा कुरकुरीतपणा आणि मसालेदार चिकनचा अप्रतिम स्वाद. हे सँडविच गरम न करता थंड सर्व्ह केले जाते, त्यामुळे उन्हाळ्यात किंवा दुपारच्या हलक्या जेवणासाठी हा पदार्थ अधिकच योग्य वाटतो.

साखर नाही, गूळही नाही! तरीही चवीला अप्रतिम; घरच्या घरी बनवा हेल्दी शुगर-फ्री लाडू

व्यस्त दिनचर्येत पटकन तयार होणारा हा पदार्थ लंच बॉक्स, पिकनिक, ट्रॅव्हल किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही उत्तम पर्याय आहे. उरलेले उकडलेले किंवा ग्रिल केलेले चिकन वापरूनही हे सँडविच सहज तयार करता येते. ताज्या भाज्या, हलके मसाले आणि चिकनची स्टफिंग यामुळे या पदार्थाला एक स्वादिष्ट चव मिळते. फक्त काही मिनिटांत तयार होणारे हे सँडविच चव आणि पोषणाचा उत्तम समतोल राखते. लगेच नोट करून घेऊ याची रेसिपी.

साहित्य

  • ८ ब्रेड स्लाईस
  • १ कप उकडलेले किंवा श्रेड केलेले चिकन
  • ४ टेबलस्पून मेयोनीज
  • १ टीस्पून मोहरीची पेस्ट (ऐच्छिक)
  • १ टीस्पून काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १ लहान कांदा (बारीक चिरलेला)
  • १ लहान काकडी (बारीक चिरलेली)
  • २ टेबलस्पून स्वीट कॉर्न
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा पार्सले
  • बटर (ब्रेडला लावण्यासाठी)
  • लेट्यूसची पाने (ऑप्शनल)
Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

कृती

  • मीठ, काळी मिरी आणि तुमच्या आवडीचे मसाले घालून चिकनला हलके भाजून घ्या, ग्रील करा.
  •  ग्रिल केलेले चिकन हाताने किंवा काट्याच्या मदतीने बारीक श्रेड करून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात चिकन, मेयोनीज, मोहरीची पेस्ट, काळी मिरी, मीठ, कांदा, काकडी, स्वीट कॉर्न आणि
  • कोथिंबीर एकत्र करून नीट मिसळा.
    ब्रेडच्या प्रत्येक स्लाईसवर हलक्या हाताने बटर लावा. त्यामुळे ब्रेड ओलसर होत नाही आणि सँडविच अधिक चविष्ट लागते.
  • एका ब्रेड स्लाईसवर लेट्यूसचे पान ठेवा. त्यावर तयार केलेले चिकन फिलिंग समान प्रमाणात पसरवा आणि दुसऱ्या स्लाईसने झाका.
  • तयार सँडविच प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे फिलिंग व्यवस्थित सेट होते आणि चव अधिक खुलते.
  • सँडविचचे त्रिकोणी किंवा चौकोनी तुकडे करा आणि टोमॅटो केचप, चिप्स किंवा थंड पेयासोबत सर्व्ह करा.अधिक हेल्दी पर्यायासाठी ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरा.
  • मेयोनीजसोबत हंग कर्ड मिसळल्यास सँडविच अधिक हलके आणि पौष्टिक बनते.
 

Web Title: Make cafe style grill chicken cold sandwich at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • chicken
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
1

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
2

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
3

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
4

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.