Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी घरीच बनवा गाजरचे मॉइश्चयराझर, चेहऱ्यावरील येईल चमकदार ग्लो

वयाच्या तिशीमध्ये त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी गाजरचे मॉइश्चयराझर अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होईल. जाणून घ्या गाजराचे मॉइश्चयराझर बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 18, 2025 | 01:40 PM
त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी घरीच बनवा गाजरचे मॉइश्चयराझर

त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी घरीच बनवा गाजरचे मॉइश्चयराझर

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्वचा आणि केसांसंबधीत अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात वाढलेला तणाव कमी करून आनंदी जीवन जगणे आवश्यक आहे. बऱ्याचदा तणावामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमांचे डाग येऊ लागतात. त्वचेवर आलेले पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच वेगवेगळे फेसपॅक, फेसमास्क किंवा इतर अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र यामुळे त्वचा सुंदर आणि देखणी होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेला सूट न होणारे प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा आणखीनच खराब होऊन जातो.(फोटो सौजन्य – iStock)

हाताचे कोपरे आणि गुडघ्यांवरील काळेपणामुळे त्रस्त आहात? २ रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून त्वचा करा उजळदार

वाढत्या वयात महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीरासह त्वचेसुद्धा हानी होते. चेहऱ्यावर आलेले वांग, पिगमेंटेशन किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र असे न करता घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावी. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. याशिवाय चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार दिसतो. त्वचा मऊ आणि सुंदर राहण्यासाठी दिवसभरातून दोन वेळा मॉइश्चरायझरचा वापर चेहऱ्यावर करावा.

गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. गाजरामध्ये असलेले गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करते. याशिवाय शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी गाजरचे सेवन करावे. विटामिन ए, सी आणि ई, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे त्वचेवर वाढलेले डाग कमी होऊन त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची चमक वाढवण्यासाठी गाजरचे मॉइश्चरायझर कसे बनवावे, याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

गाजरचे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • गाजर
  • गुलाब पाणी
  • कोरफडीचा गर
  • विटामिन ई कँप्सूल
वयाच्या ७० व्या वर्षीसुद्धा अभिनेत्री रेखाचे केस आहेत काळेभोर घनदाट! चमकदार केसांसाठी घरच्या घरी तयार करा ‘हा’ हेअरमास्क

कृती:

गाजरचे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर गाजर किसून घ्या. मिक्सरच्या भांड्यात किसलेलं गाजर आणि गुलाब पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळून घ्या. वाटीमध्ये गाजरचा रस घेऊन त्यात चमचाभर कोरफड जेल घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल घाला. यामुळे त्वचा उजळदार होईल. तयार केलेले मॉइश्चरायझर छोट्या काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर व्यवस्थित राहील. रात्री झोपताना गाजरचे मॉइश्चरायझर नियमित चेहऱ्यावर लावून झोपल्यास आठवड्याभरात फरक दिसून येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make carrot moisturizer at home to regain the lost youthfulness of the skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • carrots
  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
3

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
4

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.