Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्ट्रीट फूड खाण्याची खूप जास्त इच्छा झाली आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर टिक्का काठी रोल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीरपासून बनवलेले सर्वच पदार्थ सगळ्यांना खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही पनीर टिक्का काठी रोल्स बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 10:07 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रीट फूड खायला खूप जास्त आवडते. स्ट्रीट फूडचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी, शेवपुरी, वडापाव, भेळ, वेगवेगळ्या प्रकारचे चाट इत्यादी पदार्थ लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. पण नेहमीच विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे वजन वाढण्यासोबतच शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे तुमच्या आवडीचे स्ट्रीट फूड तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीरपासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. हिरवी चटणी, पनीर आणि चटपटीत मसाल्यांचा वापर करून बनवलेला टेस्टी पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्नॅक्ससाठी सुद्धा कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • हिरवी मिरची
  • चाट मसाला
  • लिंबू
  • घट्ट दही
  • लाल तिखट
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • मैदा
  • पुदिनाची चटणी
  • शिमला मिरची
Recipe : विकतची कशाला? घरीच बनवा हेल्दी शुगर फ्री बिस्किटे, चहाची मजा होईल द्विगुणित

कृती:

  • कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये घट्ट दही, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि लाल काश्मिरी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मोहरीचे तेल, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, लिंबाचा रस, कसुरी मेथी, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर त्यात पनीर घालून काहीवेळ तसेच ठेवा.
  • रोल्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी ताटात मैदा, गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या.
  • त्यानंतर तेल लावून ५ मिनिटं तसेच ठेवा. मैद्याच्या पिठाच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून दोन्ही बाजूने शेकवून घ्या.
  • पॅनमध्ये तेल किंवा बटर गरम करून त्यात मसाला लावून घेतलेले पनीर घाला आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत करा. त्यानंतर त्यात कांदा आणि शिमला मिरची घालून तेलात टॉस्ट करा.
  • मैद्याच्या चपातीवर पनीर टिक्का आणि भाजलेला कांदा शिमला मिरची ठेवून त्यावर हिरवी चटणी घाला. त्यानंतर वरून चाट मसाला, लिंबाचा रस आणि घालून रोल बनवा तव्यावर ठेवून कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स.

Web Title: Make crispy paneer tikka kathi rolls in just 10 minutes simple breakfast recipe paneer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.