दही मिरची रेसिपी
पावसाळा आणि थंडीच्या दिवसांमध्ये काहींना काही झणझणीत आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. घरात जेवण बनवल्यानंतर सुद्धा अनेकांना जेवणात मिरची किंवा लोणचं, चटणी इत्यादी पदार्थ लागतात. हे पदार्थ जेवणात असले की जेवणाची चव आणखीन सुंदर लागते. वरण, भात, भाजी, पोळीसोबत तोंडी लावण्यासाठी काहींना काही लागतच. काहीवेळा बाजारातून सुखवलेल्या हिरव्या मिरच्या आणल्या जातात. पण या मिरच्या चवीला एवढ्या तिखट आणि सुंदर लागत नाही. बाजारात मिळणारी महागडी पाकीट विकत घेण्यापेक्षा तुम्ही दह्यातल्या मिरच्या घरीसुद्धा बनवू शकता. बाजारात मिळणाऱ्या मिरचीपेक्षा घरी तयार केलेली मिरची चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया वर्षभर टिकणारी दही मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)