सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा
सकाळच्या नाश्त्यात अनेकांना साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मेदुवडा, डोसा, इडली किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. साऊथ इंडियन पदार्थ बनवताना प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर केला जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा तांदूळ आणि डाळ भिजत घालायची राहून जाते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करून डोसा बनवू शकता. ज्वारी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला पोषण देतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना तुम्ही आहारात ज्वारीच्या डोसाचे सेवन करू शकता. सकाळच्या वेळी सगळ्यांची खूप जास्त धावपळ असते. धावपळीच्या वेळी नेमकं नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही. नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक सकाळच्या नाश्ताकरत नाही. असे केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीचे डोसे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी