गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या येण्याची आतुरता सगळ्यांचं लागली आहे. याशिवाय घरात अनेक वेगवेगळे गोडाचे पदार्थ सुद्धा बनवले जात आहेत. गणपती बाप्पाचा अतिशय आवडता पदार्थ म्हणजे मोदक. या दिवसांमध्ये सर्वच घरात बाप्पासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवीन नवीन मोदकांचे प्रकार सांगणार आहोत. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. तुम्ही बनवलेले मोदक घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. (फोटो सौजन्य – pinterest)
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरात नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं उकडीचे मोदक खायला खूप जास्त आवडतात. हे मोदक आरती झाल्यानंतर प्रसादात सुद्धा देऊ शकता.
बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही केशर मोदक बनवू शकता. मावा आणि केशर काड्या टाकून बनवलेले मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात.
घाईगडबडीच्या वेळी झटपट तळणीचे मोदक तयार होतात. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यात ओल्या नारळाचे गोड मिश्रण बनवून मोदक तळून घ्या. हे मोदक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट मोदक खायला खूप जास्त आवडतात. सगळीकडे चॉकलेट मोदकांची मोठी क्रेझ वाढली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये मोदक लगेच तयार होतात.
प्रसादासाठी सर्वच घरांमध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मावा. मावा मोदक बाजारात सहज उपलब्ध होतात. याशिवाय तुम्ही घरीसुद्धा मावा तयार करून मोदक बनवू शकता.