बऱ्याच वर्षांपासून लसणाचा वापर जेवणाच्या पदार्थांमध्ये केला जात आहे. जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. लसणाचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल आणि कमकुवत प्रतिकारशक्तीपासून आराम मिळतो. उन्हाळ्यामध्ये ऊन वाढल्यानंतर अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत पडते. अशावेळी तुम्ही त्यांना जेवणाच्या पदार्थांमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ देऊ शकता. जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रामुख्याने जेवताना लोणचं खाल्लं जात. तुम्ही कैरी किंवा लिंबाचे लोणचं खाल्लं असेल पण आज आम्ही तुम्हाला लसणाचे लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी सांगणार आहोत.
[read_also content=”कॅल्शियम समृद्ध फळांचे सेवन केल्याने शरीराला होता आरोग्यदायी फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/consuming-calcium-rich-fruits-has-many-health-benefits-for-the-body-nrsk-533467.html”]
साहित्य:
लसूण
मेथी दाणे
राई
लाल मिरची पावडर
बडीशेप
हिंग
लिंबू
हल्दी
तेल
मीठ
[read_also content=”गुडघे दुखीचा त्रास जाणवत असेल तर आल्याचा वापर नक्की करून पाहा https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-suffering-from-knee-pain-try-using-ginger-health-nrsk-533565.html”]
कृती:
लसणाचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम २५० ग्राम लसूण सोलून घ्या. सोलून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ठेवून घ्या. त्यानंतर मेथी दाणे, बडीशेप आणि मोहरी घेऊन मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण पाकळ्या घाला.नंतर त्यात हिंग, तिखट, हळद घालून मिक्स करून घ्या. नंतर त्यात मेथी आणि बडीशेपची पावडर घालून मिक्स करा. लोणचं तयार झाल्यानंतर ते काचेच्या बरणीमध्ये ठेवून मुरण्यासाठी ठेवा. ४ ते ५ दिवसांनंतर तुम्ही लोणचं खाण्यासाठी काढू शकता.