शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय
सुट्टीच्या दिवशी किंवा इतरवेळी सकाळच्या नाश्त्यात इडली चटणी बनवली जाते. दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. त्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे इडली, डोसा. तांदूळ आणि उडीद डाळ आंबवून इडलीचे पीठ तयार केले जाते. त्यानंतर तयार केलेले पीठ रात्रभर तसेच ठेवून सकाळी इडली बनवली जाते. पण बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात शिल्लक राहिलेली इडली खाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी साध्या इडलीला तुम्ही मसालेदार तडका देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला इडली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. साधी पांढऱ्या रंगाची इडली खायला सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी इडलीला मसाल्यांचा तडका दिल्यास चव अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया मसाला इडली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट






