
थंडगार वातावरणात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मटार कचोरी
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवे वाटाणे उपलब्ध असतात. गोडसर चवीच्या वाटाण्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मटार पराठा, मटार कबाब, मटार चाट इत्यादी चविष्ट सगळेच आवडीने खातात. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, शिरा, उपमा, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी मटार कचोरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही दही कचोरी किंवा शेगाव कचोरी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. पण हिरव्या मटारपासून बनवलेली कचोरी चवीला अतिशय सुंदर लागते. गरमागरम मटार कचोरी चिंचेच्या आंबटगोड चटणीसोबत अतिशय चविष्ट लागते. ही कचोरी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. बाहेर फिरायला जाताना किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी मटार कचोरी उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या मटार कचोरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)