भाजी खायचा कंटाळा आला आहे मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुळीथ पीठ भरून बनवलेली मिरची फ्राई
जेवणाच्या ताटात कायमच वेगवेगळ्या भाज्या वाढल्या जातात. कधी कोबी, तर कधी भेंडीची भाजी बनवली जाते. पण जेवणात प्रत्येकाला काहींना काही चटपटीत आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हिरव्या मिरच्यांचे भरीत बनवू शकता. हिरव्या मिरचीचे भरीत कायमच ओल्या खोबऱ्याचा किस टाकून बनवले जाते. पण ओल्या खोबऱ्याचा वापर करण्याऐवजी कुळीथ पिठाचा वापर करावा. कोकणातील प्रत्येक घरात कुळीथ पीठ कायमच उपलब्ध असते. जेवणात भाजी किंवा डाळ नसेल तर कुळीथ पिठाचा वापर करून आंबट तिखट पिठी बनवली जाते. कुळीथ पीठ भरून बनवलेले मिरची भरीत घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही हिरवी मिरचीचे भरीत खाऊ शकता. घाईगडबडीच्या वेळी १० मिनिटांमध्ये मिरची भरीत तयार होतो. चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खावेत. चला तर जाणून घ्या कुळीथ पीठ भरून मिरची फ्राई बनवण्याची रेसिपी. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)






