How To Make Haldi Subji At Home Winter Recipe In Marathi
हाडांपासून सर्दीपर्यंत सर्व आजारांना देईल मात… शरीराला ऊबदार बनवण्यासाठी घरी बनवा ‘कच्च्या हळदीची भाजी’
Haldi Subji Recipe : हळदीची भाजी ही एक पौष्टिक भाजी आहे जी बहुतेकदा हिवाळ्यात तयार केली जाते. ही भाजी कच्च्या हळदीच्या मुळांपासून बनते जी आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते. जाणून घ्या सोपी रेसिपी.
हिवाळ्यात ही भाजी आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते
याची चव फारच अप्रतिम लागते
हिवाळासुरू झाला की आपल्या आहारात अशा पदार्थांची गरज वाढते जे शरीराला उबदार ठेवतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पचन सुधारतात. कच्च्या हळदीची भाजी ही अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपींपैकी एक आहे. हळद आपल्या आयुर्वेदात ‘नैसर्गिक अँटिबायोटिक’ मानली जाते. हिवाळ्यात कच्च्या हळदीचे सेवन केल्याने शरीरातील थंडी कमी होते, सर्दी–खोकला दूर राहतो आणि त्वचेची देखील काळजी घेतली जाते. गावाकडे तर हिवाळ्यात ही भाजी विशेष करून बनवली जाते, घरगुती देसी तूपात शिजवली तर तिचा सुगंध आणि चव दोन्ही अजूनच खुलून येतात. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.