साहित्य मटार - ३ ते ४ वाट्या खोबरं - अर्धी वाटी आलं - १ ते २ इंच लसूण - ७ ते ८ पाकळ्या मिरच्या - २ ते ३ कांदा - १ पुदिना - १ वाटी कोथिंबीर - १ वाटी मीठ - चवीनुसार धणे- जीरे पावडर - अर्धा चमचा तेल - २ चमचे कृती मटार सोलून स्वच्छ धुवून घ्यावेत. कांदा चिरुन आणि खोबऱ्याचे बारीक काप करुन घ्यावेत. आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीन, खोबरं, कांदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यावी. कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद घालून त्यामध्ये ही पेस्ट टाकून चांगली परतून घ्यावी. त्यात मटार घालून अंदाजे पाणी घालावे. सगळे चांगले एकजीव करुन त्यामध्ये धणे-जीरे पावडर, मीठ घालावी. एक उकळी आली की गॅस बारीक करुन झाकण ठवून चांगले शिजू द्यावे. कांदा, खोबरं यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीमुळे छान हिरवा रंग येतो. ही उसळ ब्रेड किंवा पुऱ्या, गरम फुलके, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते.