'YouTube Premium Lite' भारतात लाँच, किंमत फक्त... (Photo Credit - X)
YouTube Premium Lite: जगातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube ने भारतात आपला नवीन आणि स्वस्त प्लॅन YouTube Premium Lite लाँच केला आहे. यामुळे ज्या वापरकर्त्यांना जास्त किमतीमुळे YouTube Premium चा वापर करता येत नव्हता, त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
पूर्वी YouTube Premium ची मासिक किंमत ₹१४९ होती, तर आता YouTube Premium Lite फक्त ₹८९ प्रति महिना उपलब्ध असेल. ही किंमत YouTube च्या स्टुडंट प्लॅनसारखीच आहे, ज्यामुळे जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहता येतात. हा प्लॅन मोबाईल फोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीसारख्या सर्व डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे.
YouTube Premium Lite subscription launched in India for Rs 89#YouTube pic.twitter.com/wasNzXuS7n — Best Deals (@tanaymehrotra1) September 29, 2025
हा प्लॅन स्वस्त असला, तरी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा त्यात अभाव आहे. YouTube Premium आणि YouTube Premium Lite मधील सर्वात मोठा फरक हा आहे की, या प्लॅनमध्ये YouTube Music सबस्क्रिप्शन समाविष्ट नाही. तसेच, यात बॅकग्राउंड प्ले (Background Play) किंवा व्हिडिओ डाउनलोड (Offline Download) करण्याची सुविधा मिळत नाही. याव्यतिरिक्त, YouTube Shorts आणि शोध परिणामांमध्ये जाहिराती दिसू शकतात.
YouTube चा हा नवा प्लॅन वापरकर्ते आणि YouTube दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही फक्त जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहू इच्छित असाल आणि तुम्हाला बॅकग्राउंड प्ले किंवा ऑफलाइन डाउनलोडसारखी वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटत नसतील, तर ₹८९ चा हा प्लॅन तुमच्यासाठी पुरेसा आहे. पण, जर तुम्हाला YouTube Music सह सर्व प्रीमियम फीचर्सचा वापर करायचा असेल, तर ₹१४९ चा प्रीमियम प्लॅन घेणे अधिक चांगले ठरेल. यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पर्याय उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, YouTube ने आपल्या एज एस्टिमेशन टूलमध्ये एक नवीन एआय (AI) फीचर जोडले आहे, जे मुलांच्या अकाउंटची ओळख पटवून अयोग्य कंटेंटवर प्रतिबंध घालणार आहे. या एआय टूलमुळे आता १८ वर्षांखालील मुलांच्या अकाउंटची सहज ओळख पटू शकेल आणि त्यांना एडल्ट कंटेंट सुचवला जाणार नाही.
अनेक वापरकर्त्यांनी चुकीच्या वयाची माहिती देऊन अकाउंट तयार केल्यामुळे YouTube ने हा निर्णय घेतला आहे. अशा अकाउंटवर अयोग्य किंवा प्रौढ कंटेंट दिसू लागतो, ज्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी YouTube ने या नव्या AI टूलचा वापर केला आहे.
हे एआय टूल अकाउंटची ॲक्टिव्हिटी (Activity) तपासते. यात युझरचा व्हिडिओ सर्च हिस्ट्री, पाहिलेल्या व्हिडिओंचे पॅटर्न आणि अकाउंट तयार करताना दिलेले वय यांसारख्या गोष्टींची तपासणी केली जाते. या आधारावर AI टूल ते अकाउंट एखाद्या मुलाचे आहे की प्रौढ व्यक्तीचे, हे ओळखते.
रिपोर्टनुसार, अनेक Reddit वापरकर्त्यांनी त्यांच्या YouTube अकाउंटमध्ये या फीचरबद्दल पोस्ट केले आहे. ज्या अकाउंटची ओळख पटली नाही, त्यांना एक पॉप-अप मेसेज मिळाला आहे. यात सांगितले आहे की, एआय टूलला युझरच्या वयाची पडताळणी करता आलेली नाही, त्यामुळे काही सेटिंग्समध्ये बदल करण्यात आले आहेत.