Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक शेंगदाणा खोबऱ्याची वडी, नोट करुन घ्या पदार्थ

जेवणानंतर अनेकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. अशावेळी अतिसाखर असलेले पदार्थ खाण्याऐवजी शेंगदाणे खोबऱ्याची वडी खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2026 | 03:30 PM
जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? १० मिंनिटामध्ये बनवा पौष्टिक शेंगदाणा खोबऱ्याची वडी, नोट करुन घ्या पदार्थ

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? १० मिंनिटामध्ये बनवा पौष्टिक शेंगदाणा खोबऱ्याची वडी, नोट करुन घ्या पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

जेवणानंतर प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. कधी मिठाई खाल्ली जाते तर काहीवेळा चमचाभर साखर खाऊन गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग पूर्ण केली जाते. पण नेहमी नेहमी साखर किंवा अतिगोड पदार्थ खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. अतिगोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास नैसर्गिक गोडवा असलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणे खोबऱ्याची वडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.आहारात शेंगदाण्याचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघेल आणि ऊर्जा वाढेल. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक वडी खाल्ल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाईल. गुळामध्ये असलेला नैसर्गिक गोडवा शरीराचे कोणतेही नुकसान करत नाही. त्यामुळे साखर खाण्याऐवजी गुळाचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया शेंगदाणे खोबऱ्याची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

साहित्य:

  • शेंगदाणे
  • गूळ
  • पांढरे तीळ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • तूप
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • शेंगदाणे खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यात बारीक केलेला सुका मेवा भाजून काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात तूप घालून किसून घेतलेले गूळ घालून आणि पूर्णपणे वितळवून घ्या. गूळ पूर्णपणे वितळवून झाल्यानंतर किसून घेतलेल्या ओल्या खोबऱ्याचा किस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाजून घेतलेले शेंगदाणे साल काढून मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या खोबऱ्याच्या मिश्रणात टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. खोबऱ्याचे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • केळीच्या पानांवर तूप लावा आणि त्यावर तयार केलेले खोबऱ्याचे मिश्रण एकसमान पसरवून वरून पांढरे तीळ आणि सुका मेवा घालून हलक्या हाताने दाबा.
  • सुरीच्या सहाय्याने तुम्हाला हवे त्या आकारात वड्या करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या शेंगदाणा खोबऱ्याच्या वड्या.

Web Title: Make nutritious peanut coconut vadi in 10 minutes simple food recipe coconut vadi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट पॅनकेक, पदार्थ पाहून मुलं होतील आनंदी
1

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट पॅनकेक, पदार्थ पाहून मुलं होतील आनंदी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश
3

गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी
4

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.