Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पापड चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चटणी चवीला अतिशय सुंदर लागते आणि आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2026 | 08:30 AM
पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वाढल्या जातात. भाज्यांची साल, शेंगदाणे, खोबर किंवा इतर अनेक विविध पदार्थांपासून चटणी बनवली जाते. पण नेहमीच पदार्थापेक्षा काहीतरी हटके आणि टेस्टी खायचे असेल तर झटपट तुम्ही कुरकुरीत पापड चटणी बनवू शकता. तयार केलेली पापड चटणी चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. पापड खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे पापडाचा वापर करून तुम्ही विविध टेस्टी पदार्थ बनवू शकता. ओल्या चटण्यांसोबतच सुक्या चटणीचे सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पापडाची चटणी आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते. नेहमीच भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर वेगळं काही तरी खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही पापड चटणी बनवू शकता. लसूण, जवस, मिरची, कांदा , टोमॅटो, डाळं, शेंगदाणे, शेवगा इत्यादी पदार्थांचा वापर करून सुद्धा चटणी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया पापड चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

तोंडाला सुटेल पाणी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गोवन स्टाईल Green Chutney Sandwich, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पापड
  • शेंगदाणे
  • लाल सुकी मिरची
  • जिरं
  • मीठ
  • लसूण
  • हळद
  • लाल तिखट
  • पांढरे तीळ
  • तेल
गटारी स्पेशल रेसिपी: घरच्या घरी बनवा अस्सल मालवणी पद्धतीने बनवा चिकन सुक्का, वाढेल जेवणाची रंगत

कृती:

  • पापडाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, चाट ते पाच पापड गॅसवर भाजून घ्या. पापड भाजताना गॅसची जास्त फास्ट ठेवू नये. यामुळे पापड काळे पडण्याची शक्यता असते.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे खमंग भाजून घ्या. त्यानंतर त्यात पांढरे तीळ आणि लाल सुक्या मिरच्या भाजा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले साहित्य आणि पापड, चवीनुसार मीठ घालून जाडसर चटणी वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढा. फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरं, लाल तिखट आणि
  • हळद घालून मिक्स करा आणि तयार केलेल्या चटणीवर फोडणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली झणझणीत पापडाची चटणी. लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील.

Web Title: Make spicy papad chutney the easy way to double the taste of your meal simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.