Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात करा पारंपरिक पदार्थांची मेजवानी! रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा आंब्याची गोड पोळी, दुधासोबत लागेल सुंदर

आंब्याच्या सिजनला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. त्यामुळे हापूस आंब्यांपासून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गोड पोळी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 03:30 PM
उन्हाळ्यात करा पारंपरिक पदार्थांची मेजवानी! रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा आंब्याची गोड पोळी, दुधासोबत लागेल सुंदर

उन्हाळ्यात करा पारंपरिक पदार्थांची मेजवानी! रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा आंब्याची गोड पोळी, दुधासोबत लागेल सुंदर

Follow Us
Follow Us:

कोकणातला हापूस आंबा जगभरात सगळीकडे फेमस आहे. हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला खूप जास्त आवडतो. याशिवाय आंब्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक घरात हापूस आणि रायवळी आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जाता. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे हापूस आंब्याची गोड पोळी. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा घरात गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही आंब्याची पोळी बनवून खाऊ शकता. हापूस आंबा चवीला जितका सुंदर लागतो तितकाच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. नेहमीच साधा कापून आंबा खाण्याचा कंटाळा आल्यानंतर आंब्यापासून तुम्ही काहींना काही वेगळे पदार्थ बनवू शकता. आंब्याची पोळी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये तुम्ही हा पारंपरिक चविष्ट पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंब्याची पोळी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! तेलाचा वापर न करता झटपट बनवा रव्याची मऊ इडली

साहित्य:

  • हापूस आंब्याचा रस
  • गव्हाचं कणिक
  • मीठ
  • वेलची पावडर
  • रवा
  • दूध
  • जायफळ पावडर
  • हळद
जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मसालेदार शेवग्याच्या शेंगांचे लोणचं, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

कृती:

  • मोठ्या ताटात वाटीभर गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चिमूटभर हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पिठात गरम तूप घालून मिक्स करा आणि हळूहळू पाणी घालून कणिक मळून घ्या. घट्टसर गोळा तयार करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा घालून मंद आचेवर भाजा. त्यानंतर त्यात आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार दूध घालून सतत मिक्स करत राहा.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाचा घट्टसर गोळा करा.
  • गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करा आणि तयार केलेले आंब्याचे मिश्रण भरून गोळा करून त्याची हलक्या हाताने पोळी लाटून तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • आंब्याची पोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतर त्यावर तूप लावून पोळी खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली हापूस आंब्याची गोड पोळी.

Web Title: Make sweet mango pooli from juicy hapuas mangoes summer special recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Hapus

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.