Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

Tea Time Snacks Recipe : चहासोबत कुरकुरीत स्नॅक्स चवीला फार छान लागतो. आज आम्ही तुम्हाला रव्यापासून कुरकुरीत नमकपारे कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही डिश तुम्ही अनेक दिवस साठवून ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 03:30 PM
Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

Follow Us
Follow Us:
  • चहासोबत कुरकुरीत स्नॅक्स नेहमीच बनवला जातो.
  • हा स्नॅक्स बाहेरुन खरेदी न करता तुम्ही घरीच बनवू शकता.
  • चला याची रेसिपी जाणून घेऊया.
जर तुम्ही नेहमीप्रमाणे मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे स्नॅक्स खाऊन कंटाळला असाल, तर ही खास रेसिपी नक्की ट्राय करा. बाजारात मिळणारे अनेक नमकीन पदार्थ चविष्ट असले तरी ते आरोग्यासाठी नेहमीच चांगले असतीलच असे नाही. त्यामुळे घरच्या घरी, कमी साहित्य वापरून आणि हेल्दी पद्धतीने बनणारे स्नॅक्स हा उत्तम पर्याय ठरतो.

आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट

रव्यापासून तयार होणारे पदार्थ हलके, पचायला सोपे आणि कुरकुरीत लागतात. अशाच प्रकारचा एक पारंपरिक आणि सर्वांना आवडणारा स्नॅक आज आपण तयार करणार आहोत. योग्य प्रकारे साठवून ठेवल्यास हा स्नॅक अनेक दिवस ताजा राहतो आणि चहासोबत किंवा भूक लागल्यावर पटकन खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. चला याची रेसिपी जाणून घेऊयात.

साहित्य:

  • २ कप रवा
  • २ मोठे चमचे तेल (पीठ मळण्यासाठी)
  • १ छोटा चमचा जिरे
  • १ छोटा रवा ओवा
  • २ चिमूटभर हिंग
  • १ मोठा चमचा पांढरे तीळ
  • काही कढीपत्त्याची पाने
  • १ छोटा चमचा चिली फ्लेक्स
  • १.५ कप पाणी (रवा मोजण्यासाठी वापरलेल्या कपानेच)
  • २ मोठे चमचे बेसन (अतिरिक्त कुरकुरीतपणासाठी)
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

कृती:

  • हा कुरकुरीत स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम सूजी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर हे सूजीचे पीठ एका मोठ्या भांड्यात काढून ठेवा.
  • आता गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, ओवा, हिंग, पांढरे तीळ, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि चिली फ्लेक्स घालून मंद आचेवर फोडणी द्या. त्यानंतर त्यात १.५ कप पाणी घालून थोडे गरम होऊ द्या आणि गॅस बंद करा.
  • रव्याचा पिठात बेसन आणि मीठ घालून चांगले मिसळा. आता तयार केलेले गरम मसाला पाणी थोडे थोडे करत घाला आणि मऊसर पीठ मळून घ्या. पीठ खूप कडक होणार नाही याची काळजी घ्या.
  • पीठ तयार झाल्यावर त्याला थोडे तेल लावून मऊ करा. नंतर मोठ्या लाट्या घेऊन पातळ पोळ्या लाटा. चाकूच्या मदतीने त्याचे छोटे डायमंड किंवा पट्ट्यांच्या आकारात तुकडे करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात तयार केलेले तुकडे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. सर्व तुकडे समानरीत्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम आणि कुरकुरीत रव्याचे स्नॅक्स तयार आहेत.
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. चहाच्या वेळेला किंवा हलक्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय ठरेल.

Web Title: Make tasty and crispy tea time snacks recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.