Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Zunka Recipe : झणझणीत झुणका आणि खमंग भाजलेली भाकरी यांचे काँम्बीनेशन काही वेगळेच लागते. रात्रीच्या जेवणासाठी हा पदार्थ एक चांगला पर्याय ठरतो. अस्सल गावराण पद्धतीत झुणका कसा तयार करायचा याची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 09:40 AM
Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Follow Us
Follow Us:
  • झुणका भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि पारंपारिक पदार्थ आहे.
  • रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते.
  • भाजी काय बनवावी ते सुचत नसल्यास तुम्ही घरी झुणका बनवू शकता.
महाराष्ट्राच्या पारंपरिक स्वयंपाकात झुणक्याला खास स्थान आहे. कमी साहित्यामध्ये, झटपट आणि चविष्ट पदार्थ तयार करण्याची ग्रामीण महाराष्ट्रीयन पाककलेची खासियत झुणक्यात पाहायला मिळते. मुबलक साहित्यापासून तयार केला जाणारा झणझणीत झुणका ज्वारी-बाजरीच्या भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागतो. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील हा पदार्थ आजही कुटुंबातील सर्वांच्या आवडीचा ठरणारा पदार्थ आहे.  विशेष म्हणजे याला तयार करण्यासाठी स्वयंपाकघरातील मुबलक साहित्यांचीच गरज लागते. रात्रीच्या जेवणासाठी भाजी काय बनवावी ते सुचत नसल्यास तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

साहित्य

  • १ कप बेसन
  • १ मोठा कांदा बारीक चिरलेला
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरे
  • १/४ टीस्पून हिंग
  • १/२ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून लाल तिखट
  • २ टेबलस्पून तेल
  • १.५ ते २ कप पाणी
  • चवीनुसार मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

कृती

  • एका भांड्यात बेसन घेऊन त्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा. त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडल्यावर हिंग, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परतून घ्या.
  • आता बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परता. कांदा चांगला परतल्यामुळे झुणक्याला अधिक खमंग चव येते.
  • हळद आणि लाल तिखट घालून मिश्रण हलवा. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.
  • तयार केलेले बेसनाचे मिश्रण कढईत ओतत असताना दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा. यामुळे बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत.
  • मध्यम आचेवर झुणका सतत ढवळत शिजवा. पाणी आटून बेसन घट्ट होऊ लागले की झुणका तयार होत असल्याचे समजा. गरजेनुसार थोडे पाणी घालून त्याची घट्टपणा आपल्या आवडीनुसार ठेवा.
  •  शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झुणका एकदा व्यवस्थित मिसळा. गरमागरम झुणका ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, कांदा आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत वाढा.

Web Title: Make tasty and spicy gavran style zunka at home marathi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी
1

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’
2

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी
3

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
4

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.