Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडधान्य भिजवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार

डाळी, कडधान्य किंवा सुकामेवा न भिजवता कधीच खाऊ नये. थेट शिजवून खाल्ल्यामुळे अन्नाची गुणवत्ता बिघडते आणि पदार्थांमधील आवश्यक घटक शरीराला लागत नाहीत. त्यामुळे कायमच आहारात भिजवलेल्या डाळींचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 08:12 AM
कडधान्य भिजवताना केलेल्या 'या' चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार

कडधान्य भिजवताना केलेल्या 'या' चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार

Follow Us
Follow Us:

अन्नपदार्थ भिजवून खाण्याचे फायदे?
अन्नपदार्थ भिजवून खाणे का आहे गरजेचे?
कढधान्य किंवा डाळी खाण्याचे फायदे?

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जातात. आहारात कधी कडधान्य खाल्लं जात तर कधी पालेभाज्या, फळे आणि सुकामेवा इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. सकाळच्या नाश्त्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला फायदे होतात. पण कामाच्या धावपळीमध्ये बदाम पाण्यात भिजलं घालवण्याची आठवण राहत नाही. पण डाळी, कडधान्ये, सुका मेवा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिया भिजवूनच खाव्यात. अन्यथा पचनसंस्थेवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. तासनतास अन्नपदार्थ पाण्यात भिजवून ठेवण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचे सेवन करताना योग्य पद्धत फॉलो करावी. अन्नपदार्थ भिजवून खाल्ल्यामुळे ते सहज पचन होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

भिजवलेल्या डाळी किंवा सुकामेवा खाल्ल्यास शरीरातील पोषणतत्त्वांचे शोषण होते आणि अन्नाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. डाळी, कडधान्ये, बदाम, चिया सीड्स, मनुके आणि अंजीर यांसारखे पदार्थ भिजवून खाल्ल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि पदार्थांची गुणवत्ता वाढते. आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्थ न भिजवता खाल्ल्यास पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे अपचनाच्या समस्या वाढून ऍसिडिटी वाढते.

अन्नपदार्थ भिजवून खाणे का आहे गरजेचे?

वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये फायटिक ॲसिड आणि टॅनिन्स, एंझाइम इनहिबिटर्स यांसारखी विशिष्ट घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हे घटक वाढीच्या काळात बियांचे आणि धान्याचे रक्षण करतात. पण न भिजवता कढधान्य, डाळी किंवा सुकामेवा खाल्ल्यास लोह, जस्त, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या आवश्यक घटकांचे योग्य शोषण होत नाही. तसेच कडक अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. अधर्वट शिजवलेले किंवा कच्चे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात गॅस वाढतो. त्यामुळे कढधान्य, डाळी किंवा इतर सुकामेवा, बिया भिजवूनच खाव्यात.

कोणते पदार्थ भिजवून खाणे फार आवश्यक आहे?

रोजच्या स्वयंपाकासाठी घरात वेगवेगळे पदार्थ आणले जातात. त्यातील काही पदार्थ थेट कुकरच्या भांड्यात शिजवून खाल्ले जातात. पण यामुळे अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. राजमा, छोले, उडीद, अख्खे मूग, वाटाणे आणि सोयाबीन, सुकामेवा, चिया सीड्स, जवस, सब्जा बिया, मनुके, सुके अंजीर इत्यादी पदार्थ थेट खाऊ नये. रात्रभर किंवा दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवल्यानंतरच खावे. भिजवून खाल्लेल्या पदार्थांमध्ये आवश्यक फायबर युक्त घटक असतात. ज्याचा परिणाम शरीरावर लगेच होतो.

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड

अन्नपदार्थ भिजवून खाण्याचे फायदे?

  • खाल्लेले पदार्थ सहज पचन होतात.
  • कडधान्यांमुळे होणारा गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्या उद्भवत नाहीत.
  • भिजवलेल्या अन्नपदार्थांमधील लोह, झिंक आणि मॅग्नेशियम सहज शोषले जाते.
  • लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी भिजवलेले अन्नपदार्थ सहज पचते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कडधान्य भिजवणे का आवश्यक असते?

    Ans: कडधान्य भिजवल्याने ते मऊ होतात आणि शिजण्यास कमी वेळ लागू शकतो. योग्य पद्धतीने भिजवल्यास काही लोकांमध्ये कडधान्यांमुळे होणारा गॅस किंवा पोटफुगी कमी होण्यासही मदत होऊ शकते.

  • Que: कडधान्य भिजवताना कोणत्या चुका टाळाव्यात?

    Ans: कडधान्य न धुता भिजवणे, खूप वेळ खोलीच्या तापमानावर ठेवणे, भिजवलेले पाणी न बदलणे किंवा खराब वास येत असतानाही ते वापरणे टाळावे. भिजवण्याची पद्धत कडधान्याच्या प्रकारानुसार बदलू शकते.

  • Que: कडधान्य किती वेळ भिजवावे?

    Ans: कडधान्याच्या प्रकारानुसार वेळ वेगवेगळा असतो. हरभरा, राजमा यांसारख्या मोठ्या कडधान्यांना साधारण ८–१२ तास भिजवावे लागू शकते, तर मसूर डाळीसारख्या डाळींना तुलनेने कमी वेळ पुरतो.

Web Title: Making these mistakes while soaking legumes can harm your intestines aggravate indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.