
टीबी निदानासाठी 'नॅट' चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
क्षयरोगाचे वेळेत आणि अचूक निदान होण्यासाठी आधुनिक निदान तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरत असून ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत डिसेंबर २०२४ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३९ लाख २१ हजार ४८० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी २१ लाख ४८ हजार १०२ चाचण्या म्हणजेच ५५ टक्के चाचण्या आधुनिक नॅट पद्धतीने करण्यात आल्या असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आधुनिक नॅट आणि पारंपरिक मायाक्रोपिक पद्धती यात नॅट निदान पद्धतीचे प्रमाण अधिक आहे.(फोटो सौजन्य – istock)
दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
अहवालानुसार, राज्यात झालेल्या एकूण ३९,२१,४८० चाचण्यांपैकी आधुनिक नॅट चाचण्यांचे प्रमाण ५५% (२१,४८,१०२) इतके असून ४५% चाचण्या मायक्रोस्कोपी पद्धतीने केल्या आहेत. ग्रामीण भागात एकूण २८,००, २३० चाचण्यांपैकी ४७% (१३,१५,७१६) नेंट चाचण्या झाल्या आहेत, तर उर्वरित तब्बल १४,८४,५१४ चाचण्या पारंपरिक मायक्रोस्कोपीवरच सोडण्यात आल्या आहेत, मात्र सोलापूर जिल्ह्यात फक्त २५%, तर वाशीम आणि बीडमध्ये केवळ २९% रुग्णांनाच नॅट चाचणीचा लाभ मिळाला आहे. या जिल्ह्यांमध्ये ८०% पेक्षा जास्त रुग्ण अजूनही जुन्या तंत्रज्ञानाच्या भरोशावर आहेत.
मुंबईत नॅट चाचण्यांचे प्रमाण ८८% आहे. मायक्रोस्कोपीच्या तुलनेत नॅट निदान पद्धती मुंबईत वापरली जाते. एमडीआर टीबीच्या रुग्णांना शोधण्यासाठी नेंट ही आधुनिक पद्धती अधिक सोयीस्कर आणि लवकर निदान करणारी पद्धती योग्य ठरत असल्याचे पालिकेच्या टीबी प्रतिबंधात्मक कार्यक्रमातील उच्च अधिकाऱ्याने सांगितले. अप्रन्ट टीबी नेंट ही निदान पद्धती मुंबईसाठी वापरली जाते. यातून तो रुग्ण ड्रग सेंसिटिव्ह आणि ड्रग रेजिस्टन्स आहे का ते ही लवकर समजत असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले, फॉलोअप साठी स्मियर पद्धती वापरली जाते.
पावसाळ्यात ऑफिस मध्ये ‘डोळे येण्याचा’ संसर्ग वेगाने पसरतो? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
टीबी निदानासाठी नेंट, अप्रन्ट टीबी नेंट, मायक्रोस्कोपिक आणि स्मियर अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात असून यात स्मियर निदान पद्धती ही केवळ फॉलोअपसाठी वापरतात. निदान पद्धती कोणत्या भागात कोणती पद्धती वापरावी याचा निर्णय झाला आहे. उदा. मुंबई सारख्या कमी क्षेत्रफळावरील घन लोकसंख्येसाठी नेंट निदान पद्धतीवर भर दिला जात असल्याची माहिती तज्ज्ञ सांगतात.
Ans: NAAT म्हणजे Nucleic Acid Amplification Test. या आण्विक चाचणीद्वारे नमुन्यातील Mycobacterium tuberculosis चे जनुकीय घटक शोधण्यास मदत होते. काही NAAT चाचण्यांमधून औषध-प्रतिरोधाची माहितीही मिळू शकते.
Ans: NAAT चाचणी पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत तुलनेने लवकर टीबीची माहिती देऊ शकते. त्यामुळे योग्य रुग्णांमध्ये उपचार सुरू करण्याचा निर्णय लवकर घेण्यास मदत होऊ शकते.
Ans: ग्रामीण भागात आधुनिक निदान सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि प्रयोगशाळांची उपलब्धता काही ठिकाणी मर्यादित असू शकते. त्यामुळे रुग्णांचे वेळेवर निदान होण्यात अडथळे येऊ शकतात.