फोटो सौजन्य सोशल मिडिया
Nashik Farmers Distressed : नाशिक येथिल येवला तालुक्यातील नागडे शिवारात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळ परिस्थितीचा सामना येवला तालुक्यातील नागडे शिवारातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या क्षेत्रात कोबीचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना बाजार भावात मोठा धक्का बसला आहे. कोबीला बाजारात 02 किलो रुपये बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी आता हतबल झाले आहेत.
तसेच 02 रुपये किलोने बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांचा या मधून खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुळे शेतकऱ्यांनी अखेर उभ्या कोबीच्या पिकात मेंढ्या चारण्यासाठी सोडल्याने त्याच्या पिकांवर रोटावेटर फिरवला गेला आहे.
शेतकऱ्यांना दुष्काळामुळे आधीच पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि स्वखर्चातून शेतात कोबीच्या पीकाची लागवड केली. पण बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नमिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी आता पुन्हा निराशा पाहयायला मिळत आहे. 02 रुपये किलो दराने कोबी विकण्यापेक्षा आम्ही ही कोबी जनावरांना चारा म्हणून देत आहोत असे शेतकरी म्हणाले.सध्या राज्यात दुष्काळाच्या संकट असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एकीकडे पाण्याचे संकट आणि दुसरीकडे बाजारभावाची पडझड होत आहे. या दुष्काळामुळे आणि योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. त्याच बरोबर कोसळलेले बाजारभाव यामुळे शेतकरी बांधव अत्यंत गंभीर आणि दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पाणी नसल्याने पिके जगवणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
या अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही उपाय आणि पर्यायांचा करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण मध्यस्थांची साखळी मोडून काढण्यासाठी शेतकरी आठवडी बाजार, गृहनिर्माण सोसायट्या किंवा शेतकरी आपला माल थेट शहरांमध्ये जाऊन विकू शकतो. यामुळे ग्राहकांना ताजा माल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देखिल मिळेल. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक विक्री केल्यास वाहतूक खर्च वाचेल आणि बाजारात व्यापाऱ्यांशी दराबाबत सौदा करण्याची ताकद वाढेल
भाजीपाला नाशवंत असल्याने बाजारात भाव नसताना तो फेकून देण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करणे फायदेशीर असते. पाण्याचे संकट पाहता पारंपारिक पद्धतीने पाणी न देता ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler) सिंचनाचा वापर करावा. दुष्काळग्रस्त भागासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान, पीक विमा (Crop Insurance) आणि वीज बिलातील सवलती याबाबात स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती शेतकऱ्यांना द्यावी.
Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश






