Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरात एक गंभीर आरोग्य समस्या वेगाने वाढताना दिसत आहे. अलीकडील अभ्यासानुसार, या आजाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून भविष्यात परिस्थिती अधिक चिंताजनक होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 08:15 PM
धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Follow Us
Follow Us:
  • २०२३ मध्ये जगभरातील तब्बल १.३ अब्ज लोक प्रभावित.
  • १९९० च्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ.
  • चुकीची जीवनशैली आणि आहार हे मुख्य कारण ठरत आहेत.
बदलती जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्यीच्या सवयींमुळे संपूर्ण जगाचे आरोग्य बिघडले आहे. व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे रोगांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. जगभरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात प्रामुख्याने मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोग अशा आजारांचा समावेश होतो. मात्र अलिकडेच समोर आलेल्या एका आभ्यासात, एक अत्यंत आश्चर्यकाराक गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २०२३ साली जगभरातील १.३ अब्ज लोक मेटाबोलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) या आजाराने ग्रस्त होते. अशात आता विचार करा की, जगात एकूण ८ अब्ज लोकसंख्या आहे तर त्यातील १.३ अब्ज लोक यकृताच्या आजराला बळी पडले आहेत. हा आकडा फार मोठा आहे जो आपल्याला आपल्या हेल्थकडे पुन्हा एकदा गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला देतो.

वय वाढलं तरी नातं घट्ट ठेवा! आई-वडिलांना समजून घेण्याचे सोपे मार्ग जे नातं मजबूत ठेवण्यास करतील तुमची मदत

‘द लॅन्सेट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, २०२३ मध्ये अंदाजे १.३ अब्ज लोक यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. १९९० च्या तुलनेत ही संख्या अंदाजे १४३ टक्क्यांनी वाढ दर्शवते, जी अत्यंत चिंताजनक आहे. हा अभ्यास ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, इंज्युरीज अँड रिस्क फॅक्टर्स स्टडी २०२३’ मधील माहितीवर आधारित आहे. संशोधकांचा अंदाज आहे की, जर हाच कल कायम राहिला, तर २०५० पर्यंत MASLD रुग्णांची संख्या १.८ अब्जपर्यंत पोहोचू शकते. यामागील मुख्य कारणे म्हणजे वेगाने वाढणारी वृद्ध लोकसंख्या, चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण हे आहे.

अभ्यासात असेही दिसून आले की, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व यांसारख्या प्रदेशांमध्ये इतर देशांच्या तुलनेत आजाराचा धोका फार आहे. तथापि सकारात्म गोष्ट म्हणजे या आजारामुळे फार लोकांचा मृत्यू झालेला नाही. म्हणजेच आजार तर वाढत आहे पण त्यामुळे लोकांचा जीव पणाला न लागता लोक यातून सुखरुप बरे देखील होत आहेत. वेळेवर उपाययोजना केल्यास आजारातून स्वत:ला वाचवता येऊ शकते. संशोधकांच्या मते, MASLD च्या रुग्णांमध्ये झालेली वाढ मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या टप्प्यातच दिसून येत आहे. असे असूनही, धोका कमी झालेला नाही, कारण कालांतराने हा आजार गंभीर होऊन यकृत सिरोसिस किंवा यकृताच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो.

वाढत्या वयात सुद्धा कायमच दिसाल तरुण! दैनंदिन जीवनात केलेल्या ‘या’ गोष्टींचा बदल शरीरासाठी ठरेल जास्त फायदेशीर

या आजाराची प्रमुख कारणे शहरीकरण, फास्ट-फूड आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका अधिक वाढला आहे. अभ्यासातून दिसून आले आहे की, एमएएसएलडी (MASLD) हा आजार आता जगभरात वेगाने वाढत असून लोकांसाठी हे एक आव्हान बनले आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर वेळीच यावर योग्य त्या उपाययोजना करा आणि धोक्याला टाळण्यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Masld liver disease 1 3 billion people global health risk rise lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Liver

संबंधित बातम्या

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
1

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक
2

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ
3

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले
4

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.