घामाच्या वासापासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा हे पदार्थ
वाढत्या उष्णतेमुळे सर्वच नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा आणि आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर घामाच्या धारांमुळे नागरिक कंटाळून जातात. सतत येणाऱ्या घामामुळे अंगाला घाण वास मारू लागतो. कारण शरीरातील विषारी घाण घामावाटे आणि लघवीवाटे बाहेर पडून जाते. त्यामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर डिहायड्रेशन, सतत चक्कर किंवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्या उद्भवू नये, म्हणून पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते.(फोटो सौजन्य – iStock)
घामामुळे अंगाला वास येऊ लागतो. याशिवाय तर काहीवेळा कपडे पूर्णपणे ओले होऊन जातात. कडक उन्हामुळे शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी काहीवेळा आरोग्यासाठी घातक ठरते. घाम आवारंवारल्यानंतर तो शरीराच्या काही भागांमध्ये तसाच साचून राहतो, ज्यामुळे शरीरावर काळे डाग पडून त्वचा खराब होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ टाकावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कोरफड जेल टाकावे. कोरफड जेल टाकल्यामुळे त्वचा कायम हायड्रेट राहते. या पाण्याचा वापर अंघोळीसाठी केल्यास शरीरावर जमा झालेले बॅक्टरीया नष्ट होऊन त्वचा स्वच्छ राहील. अंघोळ केल्यानंतर तुम्हाला फ्रेश आणि चांगले वाटेल. कोरफडचा रस उन्हाळ्यात वापरल्यामुळे घामाचा वास नष्ट होईल.
घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. अंघोळीच्या गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून मिक्स करा. त्यानंतर अंघोळ केल्यास तुम्हाला कायम फ्रेश आणि आनंदी वाटेल. गुलाब पाण्याचा वापर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. घामामुळे काहीवेळा शरीराला सतत खाज येऊ लागते. सतत येणाऱ्या खाजीमुळे चेहऱ्यावर लाल डाग येणे किंवा रॅश येऊ लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीचे पाणी गरम करताना त्यात कडुलिंबाची पाने टाकून पाणी गरम करा. या पाण्याच्या वापरामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील.