(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात वाढत्या सूर्यप्रकाशाने मानवी त्वचेवर गंभीर परिणाम होत असतात. या परिणामांची गंभीरता इतकी खोल असते की त्यामुळे मानवी त्वचेला विविध आजार होण्याची शक्यता असते. आताच्या काळी मानव या तीव्र सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेच्या बचावासाठी सनस्क्रीन तसेच विविध साधनांचा वापर करत त्वचेचा बचाव करत आहे. पण या झाल्या आताच्या गोष्टी! पूर्वीच्या काळी अशी काही सौंदर्य साधन उपलब्ध नव्हती. पण तेव्हाच सूर्यप्रकाशाची तीव्रता मात्र होती आणि त्या तीव्रतेपासून बचाव करणे मानवाची गरज होती. शेवटी, हे मानवाचे मेंदू ते काही संशोधना वाचून राहणार आहे का? त्याकाळी ही मानवाने सन स्क्रीनचा प्राचीन पर्याय म्हणून काही नैसर्गिक साधनांचा वापर केला आणि आपल्या त्वचेचे तीव्र सूर्य प्रकाशाच्या किरणापासून बचाव केला.
मिशिगन विद्यापीठातील काही संशोधकांनी यावर अभ्यास केला आहे. 41 हजार वर्षांपूर्वी मानव कसा राहत होता? त्याची जीवनशैली कशी होती? तसेच सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांपासून स्वतःच्या त्वचेचे बचाव तो कसा करत होता? अशा विविध महत्त्वाच्या बाबींवर संशोधन करण्यात आले. ४१,००० वर्षांपूर्वी होमो सेपियन्स (मानवजातीचे पूर्वज) सूर्याच्या किरणांपासून बचावासाठी नैसर्गिक उपाय वापरत असत. Laschamps Excursion नावाच्या कालखंडात, जेव्हा पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र केवळ १०% उरलं होतं. तेव्हा सूर्यप्रकाशाची तीव्रता खूप वाढली होती. सूर्याच्या आणि ब्रह्मांडातील किरणांचा प्रभाव वाढल्यामुळे त्वचेला भाजणे, डोळ्यांचे आजार आणि फोलेटची कमतरता निर्माण होत होती. या काळात, लोकांना छायेची गरज होती. लोक विविध गुहांमध्ये तसेच सावलीच्या ठिकाणी वास्तव्य करत होते. सूर्यप्रकाशाचा हा प्रभाव जास्त करून युरोप आणि उत्तर आफ्रिका या भागांमध्ये दिसून आला होता. तरीही उष्णतेच्या या लहरीपासून मानवाने आपला बचाव केलाच. निसर्गाच्या या प्रकोपाला निसर्गाच्या भाषेनेच उत्तर दिले.
त्याकाळी तर सन स्क्रीन सारखे काही साधने उपलब्ध नव्हती पण मानवाने सन स्क्रीन म्हणून लाल माती किंवा एक प्रकारचे खनिज असणारे गेरूचा वापर केला. त्याकाळी गेरू शरीरावर लावला जात असे आणि हा खनिज एखाद्या सनस्क्रीनसारखं काम करत असे. मुळात ती परंपराच! आजही देशात काही आदिवासी जमाती परंपरा म्हणून गेरूचा वापर करत असे. गेरुचे शरीराला होणारे मुख्य फायदे म्हणजे गेरू त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. तसेच सजावटीपेक्षा तो मुख्यतः सुरक्षा कारणांसाठी वापरला जात असे.
मानवाच्या या विषयावर UM चे मानववंशशास्त्राचे प्राध्यापक Raven Garvey सांगतात की हे उपाय आजच्या ब्रँडेड क्रीम्ससारखे नव्हते, पण त्यांची परिणामकारकता होती. जेव्हा साधने उपलब्ध नव्हती तेव्हा मानवाने निसर्गामध्ये साधने शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपली जीवनशैलीत सुधार आणला.