
एक ग्लास कोमट दुधात मिक्स करून प्या 'हा' पिवळा पदार्थ, रात्रभरात चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक
चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेतली जाते. तर काही महिला प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जाऊन ब्लीच, फेशिअल, डी टॅन तर स्किन बोटॉक्स सुद्धा करून घेतात. यामुळे चेहऱ्यावर काहीकाळ अतिशय सुंदर चमक टिकून राहते. पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. धूळ, माती आणि प्रदूषणाच्या जास्त वेळी सानिध्यात राहिल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर जमा होणाऱ्या धूळ, मातीमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होऊन चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात. पण चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी त्वचेला बाहेरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कोमट दुधात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेचा रंग किंवा पोत सुधारण्यासाठी चेहऱ्यावर मसाज, फेशिअल, क्रीम इत्यादी गोष्टी सतत लावल्या जातात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. शरीर आतून स्वच्छ राहिल्यास चेहऱ्यावर ग्लो वाढतो. बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम त्वचेवर होण्याची जास्त शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. त्यामुळे चांगला आहार, शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. रात्री झोपण्याआधी किंवा सकाळच्या नाश्त्यात एक ग्लासभर कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावे.
हळदीचे दूध प्यायल्यामुळे केवळ त्वचेलाच नाहीतर संपूर्ण शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. हळदीच्या दुधाला ब्युटी मिल्क किंवा गोल्डन मिल्क असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे नियमित हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे. हळदीचे दूध प्यायल्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी हळद दूध प्यावे. चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी हळद दूध प्यावे. हळद दूध प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ होते आणि आरोग्याला भरपूर फायदे होतात.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या वापरामुळे पदार्थाची चव सुधारण्यासोबतच जेवणाचा रंग सुद्धा वाढतो. हळदीच्या दुधात केशर मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. केशरमध्ये विटामिन ए, बी, सी ओमेगा फॅटी एसिड्स आणि मेलानिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स आतून स्वच्छ करण्यासाठी हळद आणि केशराच्या दुधाचे सेवन करावे. हळद दूध प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.