Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध

Monsoon Tips : पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग, दुर्गंधी आणि त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी रोजच्या काही चुकीच्या सवयी वेळेत बदलल्यास पायांचे आरोग्य चांगले राखता येते आणि संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 08:15 PM
पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध

पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग आणि इतर त्वचाविकारांचा धोका वाढतो.
  • रोजच्या काही छोट्या सवयी नकळत पायांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
  • योग्य स्वच्छता आणि पायांची नियमित काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
पावासाळ्याच्या दिवसांत स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी लागते. आपल्या निष्काळजीपणामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. रोजच्या दिनचर्येत आपण नकळत अनेक लहान-सहान चुका करतो ज्यामुळे आजारांना खुले आवाहन मिळत असते. यातीलच एक म्हणजे फंगल इनफेक्शन. पावसाळ्यात बुरजन्य संसर्गाची समस्या फार सामान्य आहे. अनेक लोक या समस्येने त्रासलेले असतात. अनेक लोक आपले पायांची योग्य प्रकारे काळजी घेत नाहीत किंवा स्वच्छता राखत नाहीत, परिणामी बॅक्टेरिया आणि जर्म्सचा प्रभाव वाढू लागतो. पायांमध्ये होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गापासून जर स्वत:चा बचाव करायचा असेल रोजच्या जीवनातील ५ वाईट सवयी तुम्ही वेळीच टाळायला हव्यात. या सवयी पायांमध्ये इंफेक्शन, एक्झिमा आणि दुर्गंधी सारख्या समस्या निर्माण करते. चला रोजच्या जीवनातील कोणत्या सवयी पायांमध्ये संसर्गाचा धोका वाढवतात ते जाणून घेऊया.

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ

पायांमध्ये चप्पल न घालणे

पावासाळ्याच्या दिवसांत रबरी चप्पल घालणे पायांसाठी चांगले ठरते. परंतु अनेकजण पावासाळ्याच्या दिवसांत जवळच्या गल्लीत किंवा आसपासच्या ठिकाणी जाताना पायात चप्पल घालत नाही तर अनवाणीच चालतात. यानंतर त्याच ओल्या आणि घाण पायांनी घरात प्रवेश घेतला जातो. यामुळे घरात जंतूचा धोका वाढतो. डर्मेटोलॉजिस्टच्या मते, रबरी चप्पल आपल्या पायांना कोरडी ठेवण्यास मदत करते. यामुळेच गार्डन, बाथरुम किंवा घराच्या आसापासच्या ठिकाणी जाताना नेहमी पायांत रबरी चप्पल घालावी.

पावासाळ्यात लेदर शूज घालणे

ऑफीस जाण्यासाठी अनेकदा काहीजण पावसाच्या दिवसांतही पायांत लेदरचे शूज घालतात. परंतु ही सवय फंगल इंफेक्शनचा धोका वाढवू शकते. लेदरच्या चप्पलांमध्ये बॅक्टेरिया आणि ओलावा शोषला जातो ज्यामुळे जेव्हाही तुम्ही हे शूज घालाल तेव्हा ते यातील बॅक्टेरिया तुमच्या पायांवर जमा होऊ लागतील. हेच कारण आहे पावसाळ्याच्या दिवसांत लेदर शूज घालण्यास मनाई केली जाते.

मोजे घालण्यासाठी पायांना पुसा

आपले पाय कितीही कोरडे असले तरी पायांमध्ये मोजे घालण्याआधी त्यांना एकदा तरी कपड्याने चांगले पुसा. पायांची बोटांवर, नखांवर बऱ्याचदा ओलावा साचलेला असतो ज्यामुळे फंगल इंन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

नखांना लहान ठेवणे

पायांच्या नखांना गरजेपेक्षा जास्त लहान कापणे म्हणजे स्वच्छता राखणे होत नाही. खरंतर तुमच्या या सवयीमुळे बॅक्टेरिया आणि जर्म्सना खुले आमंत्रण मिळत असते. पायांची नखे जास्त लहान असल्यास त्यांच्या आत घाण आणि बॅक्टेरिया सहजपणे घुसतात. यामुळे सूज, वेदना होण्याची शक्यता असते. यामुळेच नखे फार लहान कापू नयेत.

Mosoon Tips : कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण हवंय? पावसाळ्यात घरात लावा हे 4 इंडोर प्लांट्स; डास-माश्यांचा त्रास होईल छुमंतर

रोज एकच बूट वापरणे

पावसाळ्यात शूज वापरणे खरंतर टाळायला हवं. पावसात पाय भिजत असल्याने त्यांना सुकण्यासाठी हवेची गरज असते, परंतु शूजमधून पायांना ही मोकळी हवा मिळत नाही. जर शूज वापरणे फार गरजेचे असेल तर दररोज बदलून वेगवेगळे शूज घाला. पूर्वीचे शूज चांगले कोरडे झाले की मगच त्याला पुन्हा पायांत घाला. यामुळे ओलावा, दमटपणा आणि बॅक्टेरिया साचून राहत नाही. पावसाच्या दमट वातावरणात जर शूज कोरडे होत नसतील तर हेअर ड्रायरचा वापर करुन त्यांना चांगले सुकवून घ्या.

Web Title: Monsoon health tips 5 mistakes that can increase foot infection risk during rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • fungal infection
  • lifestyle news
  • monsoon care
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
1

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
2

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
3

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया
4

Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.