
पावसाळ्यात सतत कानाचे दडे का बसतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि सोपे घरगुती उपाय, कानाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट
पावसाळ्यात कानाच्या वेदना कशामुळे उद्भवतात?
कानात दडे कशामुळे बसतात?
कानाच्या वेदनांवर घरगुती उपाय?
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरणात निर्माण झाले आहे, पण याच दिवसांमध्ये सार्वधिक आजारपण वाढते आणि शरीराला हानी पोहचते. पाऊस आल्यानंतर थंडगार वारे वाहू लागतात. हवेमध्ये वाढलेल्या ओलाव्यामुळे आणि हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. कधी पाऊस तर कधी ऊन असल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित वेगवेगळ्या समस्या वाढू लागतात. सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या, जुलाब तर डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर आजारांची शरीराला लागण होते.(फोटो सौजन्य – istock)
रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष
सर्दी, खोकला झाल्यानंतर कायमच दुर्लक्ष केले जाते. तसेच पावसाळ्यात कानाच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतात. हवेत वाढलेल्या ओलाव्यामुळे कानाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. असे मानले जाते की, कानाच्या आतील भाग नेहमीच कोरडा असणे फार आवश्यक आहे. पण पावसाळ्यात भिजल्यानंतर किंवा वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कानाच्या आतील वॅक्स मऊ होते, ज्याच्या परिणामामुळे काम करण्याच्या क्षमतेत अडथळे निर्माण होतात. आधीच कानासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांचा त्रास आणखीनच वाढू लागतो. कानात बॅक्टेरिया आणि फंगस वाढल्यानंतर कानाच्या आतील भागात खूप जास्त वेदना होतात. तर काहीवेळा कानासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.
सर्दी खोकला झाल्यानंतर कानात वेदना होण्यासोबतच कानाचे दडे बसतात. काहीवेळा कानात वाढलेल्या वेदना असह्य होतात, ज्याच्या परिणामामुळे दैनंदिन कामे करताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. वारंवार कानासंबंधित समस्या उद्भवत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा सामान्य समस्या आणखीनच तीव्र होतील. त्यामुळे पावसात भिजून आल्यानंतर कानात पाणी गेल्यास ते कॉटनच्या कपड्याच्या मदतीने किंवा कॉटन बर्डसच्या मदतीने पूर्णपणे कोरडे करावे. पुसल्यानंतरही कानात ओलावा जाणवत असेल तर हेअर ड्रायरचा वापर करावा.
वारंवार कानात वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. कानात वाढलेल्या ओलाव्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास कानाच्या समस्या कमी होतील आणि वेदनांपासून मुक्ती मिळेल. कानात वाढलेल्या ओलेपणामुळे कानाच्या आतील नसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कानात जडपणा जाणवू लागल्यास गरम पाण्याने किंवा गरम कपड्याने कानाच्या आजूबाजूने शेक द्यावा. तर ५ ते १० मिनिटं गरम पाण्याची वाफ घेतल्यास कानाचे सतत बसणारे दडे कमी होतील आणि कान आतून स्वच्छ राहील.
Ans: पावसाळ्यात आर्द्रता वाढणे, सर्दी, सायनसचा त्रास, कानातील मळ साचणे किंवा युस्टेशियन ट्यूबमध्ये अडथळा निर्माण होणे यामुळे कानाचे दडे बसू शकतात.
Ans: कान बंद झाल्यासारखे वाटणे, ऐकू कमी येणे, कानात दाब जाणवणे, गुंजन (Ringing), हलकी वेदना किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: नाही. कॉटन बड्स किंवा धारदार वस्तूंनी कान साफ केल्यास मळ अधिक आत जाऊ शकतो किंवा कानाला इजा होऊ शकते. गरज असल्यास ENT तज्ज्ञांकडून कान स्वच्छ करून घ्यावेत.