Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Skin Infections In monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि पावसात भिजल्यामुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग, रॅशेस, खाज आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा त्रासांपासून बचावासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 11, 2026 | 08:29 PM
पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Follow Us
Follow Us:
  • पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका
  • इन्फेक्शन टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
  • पावसाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी
पावसाळ्यात आल्हाददायक वाटत असले तरी या ऋतूमध्ये त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. पावसात भिजणे, ओले कपडे दीर्घकाळ अंगावर ठेवणे आणि वाढलेली आर्द्रता यामुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग, पुरळ, खाज, लालसरपणा आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः काखेत आणि पायाची बोटे यांसारख्या भागांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय

पावसात भिजल्यानंतर त्वरित अंघोळ करा

पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर साबण आणि स्वच्छ पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेवर साचलेली धूळ, प्रदूषण आणि जंतू दूर होण्यास मदत होते.

ओले कपडे लगेच बदला

ओले कपडे किंवा मोजे बराच वेळ अंगावर ठेवल्यास त्वचेवर ओलावा कायम राहतो. अशा वातावरणात बुरशी आणि जीवाणू वेगाने वाढतात. त्यामुळे भिजल्यानंतर त्वरित कोरडे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत.

त्वचा पूर्णपणे कोरडी ठेवा

अंघोळीनंतर किंवा भिजल्यानंतर टॉवेलने अंग व्यवस्थित पुसा. विशेषतः बोटांच्या फटी, काख आणि मान कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीफंगल पावडर वापरू शकता.

खाज किंवा पुरळाकडे दुर्लक्ष करू नका

त्वचेवर लालसर डाग, सतत खाज, पुरळ, जळजळ किंवा पाण्याने भरलेले फोड दिसू लागल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य वेळी उपचार घेतल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखता येतो.

पावसाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी

  • सैल आणि सूती कपडे परिधान करा.
  • टॉवेल, मोजे किंवा पादत्राणे इतरांसोबत शेअर करू नका.
  • पाय नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवा.
  • त्वचेला आवश्यक तेवढाच हलका मॉइश्चरायझर वापरा.
  • पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या, त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी योग्य स्वच्छता, ओले कपडे त्वरित बदलणे, त्वचा कोरडी ठेवणे आणि लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे या साध्या सवयी अंगीकारल्यास पुरळ, खाज आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे पावसाचा आनंद घेतानाच त्वचेच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष द्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोरफडीचा ज्यूस कसा ठरतो लाभदायक? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Web Title: Monsoon skin care skin infection rashes itching fungal infection health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Monsoon
  • Skin Care
  • Skin disease
  • skin problem

संबंधित बातम्या

Festive Look: सणासुदीला परफेक्ट लुक, ५ संकेतांकडे दुर्लक्ष पडू शकतं महाग; कसे ओळखाल?
1

Festive Look: सणासुदीला परफेक्ट लुक, ५ संकेतांकडे दुर्लक्ष पडू शकतं महाग; कसे ओळखाल?

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल
2

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
3

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक
4

Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.