Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

Mirchi Bhaji Recipe : पावसाळ्याचे थंडगार वातावरण आणि कुरकुरीत मिरची भज्यांची मजाच काही न्यारी. एकदम स्ट्रीट स्टाईल मिरची भजी घरी बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या कामाची ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 09:25 AM
Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट 'मिरची भजी'

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट 'मिरची भजी'

Follow Us
Follow Us:
  • मिरची भजी तर सर्वानाच खायला फार आवडतात.
  • पावासाळ्यात भजी खाण्याची मजा काही वेगळीच.
  • तुम्ही घरीच पावासाळ्याच्या या सीजनमध्ये कुरकरीत मिरची भजी बनवू शकता.
पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम चहा आणि त्यासोबत खुसखुशीत मिरची भजी मिळाली तर त्याची चव काही वेगळीच असते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असलेली ही भजी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आवर्जून बनवली जातात. मोठ्या हिरव्या भजीच्या मिरच्यांपासून तयार होणारी ही रेसिपी तिखट असली तरी योग्य मसाल्यांमुळे तिची चव संतुलित राहते. पारंपरिक पद्धतीने बनवलेली मिरची भजी सण, मेजवानी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठीही उत्तम पर्याय ठरते. हिरवी चटणी, चिंचेची गोड-तिखट चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर हे भजी अधिकच रुचकर लागतात. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आज कृती जाणून घेऊया.

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य

  • 8 ते 10 मोठ्या भजीच्या हिरव्या मिरच्या
  • 2 कप बेसन
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून हळद
  • 1 टीस्पून धणे-जिरे पूड
  • ½ टीस्पून ओवा
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • चिमूटभर बेकिंग सोडा (ऑप्शनप)
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

कृती

  • मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करा. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. हवे असल्यास आतील बिया थोड्या काढून टाका.
  • एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, ओवा, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा घाला. त्यात थोडे-थोडे पाणी घालत गाठी नसलेले घट्ट पीठ तयार करा.
  • कढईत पुरेसे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल मध्यम आचेवर योग्य तापमानाला येऊ द्या.
  • प्रत्येक मिरची पूर्णपणे बेसनाच्या पिठात बुडवून सर्व बाजूंनी समान थर लागेल याची काळजी घ्या.
  • गरम तेलात मिरच्या सावकाश सोडा. मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेली भजी टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि भजी अधिक खमंग लागतील.
  • गरमागरम मिरची भजी हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
 

Web Title: Monsoon special recipe know how to make mirchi bhaji at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • chili
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
1

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
2

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
3

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
4

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.