
जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?
Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
कशी तयार करण्यात आली लिस्ट?
या सर्वेनुसार, १ एप्रिल पासून ते ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन व्होटींग वेबसाईटवर हजारो पर्यटकांनी भाग घेतला. सर्वेमध्ये हाॅटेल्स, रिसाॅर्ट, एअरलाइन्स, शहरे, बेटे आणि क्रूझ लाइन्स यांसारख्या विविध कॅटेगरिजचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेमध्ये रेटिंगचे पाच स्केल निश्चत करण्यात आले होते ज्यात सर्वोत्तम, खूप चांगले, चांगले, ठीक आणि वाईट अशा पर्यायांचा समावेश होता.
हा आहे जगातील नंबर १ देश?
Condé Nast Traveller ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार ग्रीस या देशाने बेस्ट देशांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. येथील सँटोरिनी, मायकोनोस, क्रीट, पारोस, हायड्रा आणि टिनोस यांसारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. ग्रीसची राजधानी अथेन्स हे केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नसून देशातील एक क्रिएटिव्ह स्पाॅट देखील मानले जाते. येथील सुंदर आर्ट गॅलरिज आणि अप्रतिम हाॅटेल्स या ठिकाणाला युरोपमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक बनवते.
Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित
टॉप 10 मध्ये कोणते देश सहभागी आणि भारताचा कितवा क्रमांक?
या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर जपान, तीसऱ्या स्थानावर इटली तर तुर्कीयेने पाचवे स्थान पटकावले आहे. यासोबतच पुर्तगाल सहाव्या स्थानावर, कोस्टा रिका सातव्या तर क्रोएशिया आणि इंडोनेशिया आठव्या स्थानावर आहेत. या लिस्टमध्ये नवव्या स्थानावर नाॅर्वे हा देश आहे तर दहाव्या स्थानावर थायलंड देशाने बाजी मारली आहे. भारताने या लिस्टमध्ये १७ वे स्थान मिळवले आहे. म्हणजेच ग्लोबल लेव्हलवर भारत टाॅप २० लिस्टमध्ये सामील झाला आहे.