Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Health: सकाळच्या ‘या’ सवयींकडे दुर्लक्ष करू नका; हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Morning Habits Causes Heart Problems: सकाळच्या सवयींचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो, मात्र अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. चुकीच्या सकाळच्या दिनचर्येमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि हृदयाचे विकार होण्याचा धोका वाढतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 08:25 PM
Heart Health: सकाळच्या ‘या’ सवयींकडे दुर्लक्ष करू नका; हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम
Follow Us
Follow Us:
  • सकाळच्या या सवयीं करतील हृदयावर परिणाम
  • वाढू शकतो हृदयविकाराचा धोका
  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी करा
हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली महत्त्वाची मानली जाते. मात्र, अनेकदा लोक सकाळच्या दिनचर्येकडे फारसे लक्ष देत नाहीत. दिवसाची सुरुवात कशी होते याचा थेट परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर आणि विशेषतः हृदयावर होऊ शकतो. काही सवयी अशा असतात ज्या रोजच्या जीवनाचा भाग बनतात, पण त्या नकळत हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या सवयी अंगीकाराव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र, रिकाम्या पोटी कॅफिनयुक्त पेये घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढू शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळी पाणी न पिण्याची सवय

रात्री अनेक तास झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशा वेळी पुरेसे पाणी न प्यायल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.

उठल्या उठल्या तणाव घेणे

सकाळी डोळे उघडताच मोबाईलवरील ई-मेल्स, सोशल मीडिया किंवा ऑफिसचे संदेश तपासण्याची सवय अनेकांना असते. यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच मानसिक तणाव वाढून रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. याचा परिणाम हृदयावर आरोग्यावर ऊ शकतो.

नाश्ता टाळणे

व्यस्त दिनचर्येमुळे काही लोक सकाळचा नाश्ता टाळतात. मात्र, पौष्टिक नाश्ता न घेतल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होऊ शकते आणि दीर्घकाळात हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अचानक तीव्र व्यायाम सुरू करणे

उठल्याबरोबर कोणतीही तयारी न करता कठोर व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते. शरीराला हळूहळू सक्रिय करणे गरजेचे असते. सुरुवातीला स्ट्रेचिंग, चालणे किंवा योगासारख्या हलक्या हालचाली करणे अधिक योग्य ठरते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी करा

सकाळी पुरेसे पाणी प्या, संतुलित नाश्ता घ्या, काही वेळ शारीरिक हालचाल करा आणि अनावश्यक तणाव टाळा. नियमित झोप, योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैलीच्या मदतीने हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते. छोट्या वाटणाऱ्या सवयींमध्ये बदल केल्यास भविष्यातील हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश

Web Title: Morning habits heart health risk factors heart disease prevention tips lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • heart care tips
  • heart problems
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
1

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
3

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.