Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर

तोंडात आलेले अल्सर कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे, यासोबत लिंबू, हिरव्या पालेभाज्या इत्यादींचे सेवन केल्यामुळे अल्सर बरे होतात. याशिवाय विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 04, 2025 | 11:13 AM
तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! 'या' पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर

तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! 'या' पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरतात. यामुळे शरीरात लहान मोठे बदल दिसून येतात. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर बऱ्याचदा तोंडात जखमा होणे, अल्सर किंवा बारीक बारीक फोड येतात. हे फोड आल्यानंतर तोंडात अतिशय तीव्र वेदना होतात, ज्यामुळे अन्नपदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. याशिवाय बोलताना खूप जास्त त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे सुद्धा तोंडात अल्सर येतात. अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवल्यानंतर सुद्धा तोंडात अल्सर येण्याची शक्यता असते. विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर सगळ्यात आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे तोंडात जखमा होणे किंवा बारीक बारीक फोड येणे.(फोटो सौजन्य – istock)

कंबरेवर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी कॉफीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, महिनाभरात दिसून येईल शरीरात बदल

तोंडात आलेले फोड किंवा अल्सर घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय किंवा गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा काहीच फरक दिसून येत नाही. हे फोड घालवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि जीवनशैलीतील बदलांच्या परिणामामुळे तोंडात आलेले फोड कमी होतील. आज आम्ही तुम्हाला तोंडात आलेले अल्सर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे रातोरात अल्सर आणि तोंडातील जखमा दूर होतील.

दही ताक:

शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तोंडात फोड किंवा अल्सर येतात. अशावेळी आहारात थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. दही, ताक, लस्सी किंवा इतर थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. दह्यामध्ये असलेल्या घटकांमुळे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टरीया वाढतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. दुपारच्या जेवणात नियमित एक वाटी दही खाल्यास पोटात वाढलेली जळजळ कमी होईल.

हिरव्या पालेभाज्या:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण असे न करता रोजच्या आहारात नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. पालेभाज्या खाल्यामुळे तोंडात आलेल्या लहान लहान जखमा कमी होतात आणि तोंडात वाढलेली जळजळ कमी होते.

आता हृदयाचे आरोग्य राहील ठणठणीत! ‘या’ खास उपकरणाच्या मदतीने हृदयाच्या अनियमित ठोक्यांचे होईल व्यवस्थापन

लिंबू:

दैनंदिन आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. याशिवाय तोंडात आलेले फोड किंवाजखमा बऱ्या होतात. यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. पेरू, लिंबू, मोसंबी किंवा आंबट फळांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mouth sores ulcers heal overnight consuming these foods will eliminate vitamin b12 deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत
1

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे
2

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
3

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
4

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.