फोटो सौजन्य: iStock
पुढच्या पिढीतील लीडलेस पेसमेकर हृदयाच्या अनियमित ठोक्यांच्या उपचारात क्रांती घडवत आहेत. आज आपण हाताच्या तळव्यात मावणाऱ्या छोट्या बॅटऱ्या अत्याधुनिक उपकरणांना ऊर्जा पुरवताना पाहतो. आता कल्पना करा याहूनही छोटं उपकरण मानवी हृदयाला नियमित ठोके द्यायला शक्ती देत आहे. ही पुढच्या पिढीची हृदयविषयक तंत्रज्ञानक्रांती म्हणजे लीडलेस पेसमेकर, जो हृदयाच्या अनियमित ठोक्यांचे व्यवस्थापन करण्यासाठीतयार करण्यात आला आहे.
हृदयाचे ठोके कधी खूप जलद, कधी खूप संथ किंवा अनियमित होतात, त्यालाच अनियमित हृदयस्पंदन म्हणतात. याकडे दुर्लक्ष झाल्यास रुग्णांना गंभीर गुंतागुंतींना सामोरे जावे लागू शकते, अगदी जीवाला धोका निर्माण होण्यापर्यंत. यातीलच एक सामान्य प्रकार म्हणजे ब्रॅडिकार्डिया, ज्यामध्ये हृदय इतके संथ ठोके देते की शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत.
लेटेस्ट पिढीतील लीडलेस पेसमेकर हे विकार प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हे पेसमेकर अतिशय लहान आकाराचे असून, अल्प-आक्रमक पद्धतीने बसवले जातात आणि गरज पडल्यास परत काढूनही घेता येतात.
पेसमेकर हे एक वैद्यकीय उपकरण आहे जे हृदयाचे ठोके नियमित ठेवायला मदत करते. पारंपरिक पेसमेकर
साधारणपणे हनुवटीजवळ छातीच्या त्वचेखाली बसवले जातात आणि तारा (ज्यांना ‘लीड्स’ म्हणतात) द्वारे हृदयाशी जोडलेले असतात. या तारांमधून हृदयाला विद्युत संदेश पाठवले जातात, ज्यामुळे हृदयाचे ठोके योग्य गतीने चालतात. यामुळे छातीत दुखणे, थकवा, धडधड किंवा अस्वस्थता अशा त्रासांपासून आराम मिळतो.
5 आजारांचा विनाश करतील 5 डाळी, बाबा रामदेव यांनी सांगितले परफेक्ट उपाय
“लीडलेस पेसमेकर असे विकसित केले गेले आहेत की डॉक्टरांसाठी त्यांची बसवणी आणि काढणी शक्य तितकी सोपी होईल, तसेच विद्यमान तंत्रज्ञानाच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा मिळतील,” असे भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग, तैवान आणि कोरिया येथील कार्डियाक रिदम मॅनेजमेंटचे जनरल मॅनेजर, ॲबॉट अजय सिंग चौहान यांनी सांगितले, “हे रुग्णांसाठी खरंच जीवन बदलून टाकणारे ठरत असून, हृदयाच्या ठोक्यांच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नवी दालने उघडते आहे.”
तंत्रज्ञानामुळे पेसमेकर आता आधीपेक्षा अधिक छोटे आणि आकर्षक झाले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक प्रणालीतील मोठ्या अडचणींवरही तोडगा निघाला आहे, जसे की छातीत पाउच तयार करणे किंवा तारा वापरणे, जिथे संसर्ग होणे, तारा हलणे किंवा तुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्यांमुळे गंभीर हृदयविकार निर्माण होऊ शकतात आणि अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते. पण नव्या प्रगतीमुळे या अडथळ्यांवर मात करता येते, कारण हृदयविषयक तंत्रज्ञानातील नवकल्पनांमुळे अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर वास्तवात उतरले आहेत.
अपोलो हॉस्पिटल्स, सीबीडी बेलापूर, मुंबई येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजीवकुमार कलकेकर यांचे मत आहे की लीडलेस पेसमेकर हे हृदयविकार उपचारातील एक क्रांतिकारक पाऊल आहे. पारंपरिक पद्धतीतील गुंतागुंत टाळून ही पद्धत सुरक्षितता आणि सोय देते. विशेषत: टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये जिथे फॉलो-अप केअर सहज उपलब्ध नसते, तिथे ही तंत्रज्ञानक्रांती रुग्णांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहे.
हृदयविषयक उपचार सातत्याने प्रगत होत आहेत आणि लीडलेस पेसमेकर यामध्ये एक नवा मापदंड ठरवत आहेत. हे पेसमेकर रुग्णांच्या बदलत्या गरजांनुसार जुळवून घेऊ शकतात, हृदयाचे ठोके अधिक नैसर्गिक ठेवतात आणि आरोग्याच्या परिणामांमध्ये सुधारणा घडवतात. संसर्गाची शक्यता कमी करून व पुन्हा हस्तक्षेपाची गरज घटवून हे तंत्रज्ञान रुग्णांना सुरक्षित, प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय उपलब्ध करून देते.